मनपा डी विभागात गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ हाऱ्या- नाऱ्याची जोडी कार्यरत

कनिष्ठ अभियंत्या पदापासून कार्यकारी अभियंता पर्यंत एकाच विभागात बढती दिल्यामुळे वाढला भ्रष्टाचार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातील जल खात्यामध्ये गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळ दोन अभियंते एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवणे ऐवजी सदर अभियंते भ्रष्टाचार करत असल्यामुळे त्यांच्या विरोधात आता स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी थेट मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, नगर अभियंता दिलीप पाटील वरळी हब येथील हायड्रोलिक इंजिनियर खात्याच्या प्रमुखांकडे अभियंत्यांनी विरोधात तक्रार केली आहे 

पालिका डी विभागातील जलखात्यात दुय्यम अभियंता पदावर रमेश खेडकर हे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत तर जल खात्याच्या सहाय्यक अभियंता ह्या मुख्य पदावर प्रशांत बागवे हे गेल्या १५ वर्षांपासून ह्या खात्याच्या कार्यभार सांभाळत आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागाकडून अनेक वेळा  काढण्यात आले होते पण संबंधित अभियंत्यांची बदली दुसऱ्या विभागात करणे ऐवजी त्यांना एकाच विभागात कनिष्ठ अभियंता पदापासून ते सहाय्यक अभियंता पदापर्यंत बढती देण्यात आली आहे 

दोन्ही अधिकारी वरिष्ठांच्या मर्जीतले तसेच लोकप्रतिनिधींचे खासमखास  असल्याची चर्चा डी विभागात सर्वत्र पसरली आहे.

महानगरपालिका डी विभाग परिसरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला आहे जागोजागी टॉवर उभारले जात आहेत टॉवर मध्ये राहायला येणाऱ्या रहिवाशांची संख्या देखील अधिक आहे सर्वांना मुबलक पाणी मिळण्यासाठी टॉवरमध्ये बेकायदेशीर रित्या मोटार व बूस्टर पंप लावले जात आहेत. त्यामुळे डी विभाग परिसरातील जुन्या चाळी आणि इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पाण्याची समस्या भेडसावू लागली असून त्याबद्दल अनेकांनी डी विभागात तक्रारी  देखील केल्या आहेत व त्या वेळोवेळी स्थानिक समाजसेवकांनी डी विभागाकडे तक्रारीरी  पाठवलेले आहेत परंतु त्यावर नाम मात्र कारवाई होत असल्यामुळे संबंधित अधिकारी पाण्याची लाईन विकून मोठ्या प्रमाणात हॉटेल चालक, कारखाने, खाजगी कार्यालय आणि विकासकांकडून पैसे उकळण्याचे धंदे करत असल्याचा आरोप तक्रारदार व स्थानिक आरिफ शेख यांनी केला आहे

सदर अभियंते अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असल्यामुळे पाण्याची लाईन कनेक्शन विकणारे  दलाल आणि या अभियंत्यांमध्ये चांगलेच साठे लोटे जमलेले आहे कारण डी विभागात ह्या अधिकाऱ्यांच्या अवती भवती सदैव दलालांची उपस्थिती दिसून येते ३ वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही अधिकारी महानगरपालिकेच्या एकाच विभागात आणि एकाच खात्यात कार्यरत राहू शकत नाहीं असा नियम आहे मग ह्या अधिकाऱ्यांना आजपर्यंत कोणाच्या कृपादृष्टीमुळे डी विभागात कार्यरत ठेवण्यात आले आहे ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

डी विभागातील दोन अभियंत्यांच्या तक्रारी विषयी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील नगर अभियंता दिलीप पाटील यांना अभियंत्यांच्या विरोधात असलेल्या नारिकांच्या तक्रारी बद्दल विचारणा केली असता त्यांच्या खात्यातर्फे तीन वर्षानंतर अभियंत्यांच्या बदलीचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला पाठवले जातात त्यावर वरळी येथील हायड्रोलिक इंजिनियर खात्याचे प्रमुख आणि मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी. त्या अभियंत्याबद्दल निर्णय घेतात अशी माहिती दिली तसेच डी विभागातील अभियंत्यां बाबत  नागरिकांच्या तक्रारी असतील तर  त्यांची बदली दुसऱ्या विभागात करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले.

प्राप्त झालेल्या तक्रारी विषयी डी विभाग जल खात्याचे दुय्यम अभियंता संदेश खेडकर यांना एकाच खात्यात दहा वर्षे पूर्ण झाली आहेत का  असे शहनिशा करण्यासाठी विचारले असता त्यांनी ते मान्य केले आणि हो मला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत असे सांगितले आता डिपार्टमेंट ने बदली करावी माझ काही हरकत नाहीं बदली मी थांबवलेलं नाही असे खेडकर यांनी उत्तर दिले.

डी विभागा जल खात्याचे  सहाय्यक अभियंता प्रशांत बागवे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही तसेच दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत होता

संबंधित पोस्ट