
मुंबईच्या साहित्य संघ मंदिरात १६ डिसेंबरपासून ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा होणार सुरू
- by Reporter
- Dec 13, 2023
- 301 views
मुंबई - महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई केंद्रांवर (साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई केंद्र: १ व यशवंत नाट्य मंदिर माटुंगा ) या दोन ठिकाणी दिनांक २० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. शनिवार, १६ डिसेंबर, २०२३ पासून साहित्य संघ मंदिर, गिरगाव (मुंबई केंद्र: २) येथे प्राथमिक फेरीच्या दुसर्या टप्प्यातील नाट्यप्रयोग १६ डिसेंबरपासून सादर होणार आहेत. या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातून एकूण ६० नाट्यप्रयोग प्राथमिक फेरीत सादर होणार आहेत.
शनिवार १६ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. पृथ्वीचे शेतकरी, लेखक: ऋषी दास, रसिका कुष्टे, दिग्दर्शक: विद्यानाथ सुर्वे आर्टिस्टिक ह्युमन्स, मुंबई, सोम. दि. १८ डिसें. सायं. ७ वा. चंद्र माधवीच्या प्रदेशात, लेखक व दिग्दर्शक: डॉ. शिरीष ठाकूर, अलर्ट सिटीझन फोरम, मुंबई, मंगळ. दि. १९ डिसें. सायं. ७ वा. दोन शून्यांची बेरीज, लेखक: विनीता पिंपळखरे, दिग्दर्शक: विराज नारिंग्रेकर, भारतीय स्टेट बैंक, मुंबई, बुध. दि. २० डिसें. सायं. ७ वा. एलिजिबिलिटी, लेखक: मनाली काळे, दिग्दर्शक: अमित सोलंकी, कल्पांगण सांस्कृतिक केंद्र, मुंबई, गुरु. दि. २१ डिसें. सायं. ७ वा. ओबीसी, लेखक: बाळासाहेब थोरात, दिग्दर्शक: शिल्पा सावंत, मैत्रेय संघ, मुंबई, शनि. दि. २३ डिसें. दु. ४ वा. अरण्यदाह, लेखक: प्रभाकर मयेकर, दिग्दर्शक: सुरेश गांगुर्डे, मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन, मुंबई, रवि. दि. २४ डिसें. सायं. ७ वा. नजरकैद, लेखक: अभिजीत वाईकर,दिग्दर्शक: प्रतिमा कांबळे, प्रभात मित्र मंडळ, मुंबई, मंगळ. दि. २६ डिसें. सायं. ७ वा. चाफा बोलेना, लेखक: रवी वाडकर, दिग्दर्शक: अभिषेक भगत, नवी मुंबई म्युझिक अँड ड्रामा सर्कल, वाशी, गुरु. दि. २८ डिसें. सायं. ७ वा. सखी उर्मिला, लेखक: राजीव जोशी, दिग्दर्शक: संतोष कोयंडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्टस क्लब, मुंबई, शुक्र. दि. २९ डिसें. सायं. ७ वा. जेंडर अॅन आयडेंटीटी, लेखक: डॉ. सोमनाथ सोनवलकर, दिग्दर्शक: राजेंद्र पोतदार, सहप्रमुख कामगार अधिकारी, पश्चिम उपनगरे, बृहन्मुंबई म.न.पा., शनि. दि. ३० डिसें. दु. ४ वा. साठा पत्रौत्तराची कहानी असफल अपूर्ण, लेखक: चंद्रमणी तुर्भेकर, दिग्दर्शक: महेंद्र दिवेकर मोरया प्रतिष्ठान, मुंबई, सोम. दि. १ जाने. सायं. ७ वा. तेरे मेरे बीच में, लेखक: आबा पेडणेकर, दिग्दर्शक: दत्तात्रय (आबा) पेडणेकर, साई कला व सांस्कृतिक ट्रस्ट, मुंबई, मंगळ. दि. २ जाने. सायं. ७ वा. दादला नको गं बाई, लेखक व दिग्दर्शक: शशांक बामनोलकर, सम्यक कलांश प्रतिष्ठान, मुंबई, बुध. दि. ३ जाने. सायं. ७ वा. आदिम, लेखक व दिग्दर्शक: अक्षय राठोड, स्वारंग सांस्कृतिक संस्था, शाखा मालाड, गुरु. दि. ४ जाने. सायं. ७ वा. द फियर फॅक्टर, लेखक: अमेय दक्षिणदास, दिग्दर्शक: समीर पेणकर, स्वराज्य फाऊंडेशन, मुंबई, शुक्र. दि. ५ जाने. सायं. ७ वा. रुद्राक्षा, लेखक व दिग्दर्शक: अवधूत भिसे, राजयोग कलामंच, मुंबई, शनि. दि. ६ जाने. दु. ४ वा. अनवॉन्टेड, लेखक: प्रकाश गावडे, दिग्दर्शक: चेतन किंजळकर, दी मानवता असोशिएशन, मुंबई, सोम. दि. ८ जाने. सायं. ७ वा. पुढच्या वर्षी लवकर या, लेखक: संदेश जाधव, दिग्दर्शक: मंचल दर्णे, उपप्रमुख कामगार अधिकारी, पूर्व उपनगरे, बृहन्मुंबई म. न. पा. हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा संपन्न होणार असल्याचे विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी नमूद केले. दरवर्षी जल्लोषात संपन्न होणार्या रंगकर्मींचा सोहळा समजल्या जाणार्या या स्पर्धेस नेहमीच मुंबईकर रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. याही वर्षी सदर स्पर्धेस जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहून कलावंताना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून करण्यात आले आहे.
रिपोर्टर