टोल प्लाझा की सरकारमान्य दरोड्याची केंद्रं?

मुंबई-  मुंबई पुणे एक्सप्रेस वर खालापूर आणि तळेगाव येथे टोल प्लाझा आहेत खालापूर येथे ८० तर तळेगाव येथे २४० रुपये टोल. आहे काल परवा मुंबईहून पुण्याला येताना एका गाडीचे फास्टट्रॅग मधील पैसे संपले असल्याने ६४० रुपये वसूल केले गेले. वास्तविक पाहता खालापूरचा टोल ८०  रुपये

असल्यामुळे अगदी दंडासह १६०  रुपये त्यांनी वसूल केले असते तर कदाचित चालले असते. परंतु त्यांनी पुढच्या म्हणजे तळेगाव नाक्याचा टोलसुद्धा दंडासह वसूल केला. 

त्यानंतर गाडी मालकाने फास्टट्रॅग  रिचार्ज केलं आणि तळेगाव टोल नाक्यावर पुन्हा २४० रुपये फास्टट्रॅग मधून कट झाले. म्हणजे एकूण ८८०  रुपये वसूल करण्यात आले. चौकशी केली असता कस्टमर केअर नंबर वर प्रयत्न करा असे सांगण्यात आले. हा नागरिकांच्या पैशावर टाकलेला सरळ सरळ दरोडा आहे.

परवा तळेगाव टोलनाक्यावर बॅलन्स नाही असे सांगून ड्रायव्हरला गाडी मागे घेउन बॅलन्स भरण्यास सांगितलं.बॅलन्स होताच. तरीही त्याला रोख पैसे भरण्यास सांगण्यात आले. परंतु ड्रायव्हरने बॅलन्स आहे असे सांगून पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर त्याचा मोबाईल काढून घेउन गाडी पुढे लावण्यास सांगण्यात आले. शेवटी त्या कर्मचाऱ्यांनी फास्टट्रॅगमध्ये बॅलन्स आहे हे मान्य करून २४० रुपये घेतले. परंतु त्यानंतर वाशी टोलनाक्यावर पुन्हा डिस्प्लेवर blacklisted असं आल्यामुळे रोख पैसे भरण्याचा आग्रह करण्यात आला. परंतु ड्रायव्हर खमक्या होता त्याने मोबाईलवर बॅलन्स असल्याचे दाखवल्यानंतर गाडी सोडून देण्यात आली.हा सगळा काय प्रकार आहे टोल नाक्यावर दरोडेखोर बसवलेले आहेत का? टोल प्लाझा आणि त्यांचे कस्टमर केअर

मधील कर्मचार्‍यांची भाषा आणि वर्तणूक याबाबत न बोललेले बरे.ज्यांच्याकडून ८८० रूपये वसूल केले त्या २ महिला होत्या.

काल तर म्हणे गुजरातमध्ये अख्खा एक बनावट टोल नाका सापडला. आता त्याची चौकशी वगैरे प्रकार सुरू आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर टोल कशासाठी घेतात हेच समजत नाही. टोल नियमानुसार एकही सुविधा त्यावर दिली जात नाही.टोल प्लाझा चालकांवर  कुणाचं नियंत्रण आहे की नाही? केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या टोल नाक्याची चौकशी करून संबधित सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.


संबंधित पोस्ट