चारकोप येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी आमदार योगेश सागर यांचे कडून गंभीर दखल.

मुंबई (भारत कवितके) मुंबई मधील कांदिवली उपनगरातील चारकोप विभागातील रहिवाशी अपुरा,कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणी पुरवठा,तर नळाला पाणी न येणे अशा विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत.या तक्रारी ची गंभीर दखल चारकोप भाजपा विधानसभा आमदार योगेश सागर यांनी घेतली.आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयात चारकोप रहिवाशीनी लिखीत स्वरुपात तक्रारी केल्या होत्या.या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी बाबत निरसन करण्यासाठी बुधवार दिनांक १ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मनपा आर दक्षिण विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा करून निवेदने देऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पाणी विभागातील सहाय्यक अभियंता च्या काही ठिकाणी जागा च भरल्या नाहीत त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत.असे समजले पाणी पुरवठा विभागात काही तांत्रिक बिघाड झाल्यास कोण समस्या सोडविणार,हा प्रश्न या ठिकाणी योगेश सागर यांनी उपस्थित केला.शेवटी येत्या एक दोन दिवसात चारकोप येथील पाणी पुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे सुरू करण्यात येईल असे आश्वासन मनपा आर दक्षिण विभाग पाणी विभागातील अधिकारी वर्गानी दिला.बैठकीला आमदार योगेश सागर, मंडळ अध्यक्ष व नगरसेवक मा.बाळा तावडे, नगरसेवक,कमलेश यादव,मनपा आर दक्षिण जल विभागातील सोंडे कार्यकारी अभियंता तसेच राठोड,व इतर अधिकारी, गिरीधर साळुंखे, महामंत्री ठाकूर संजय सिंह, योगेश पडवळ, नगरसेविका मा.लिना देहेकर,सह भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते, चारकोप येथील सोसायटी चे पदाधिकारी व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित पोस्ट