भीम आर्मीचे राज्यनेते भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद....जागोजागी महात्मा रावणाची पूजा.
- by Reporter
- Oct 22, 2023
- 277 views
कल्याण ( प्रतिनिधी ) भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राज्यप्रवक्ते , सुप्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका व्हिडीओ द्वारे समस्त भारतीय जनतेला आवाहन केले होते की , "रावण प्रतिमा दहन करण्यापेक्षा रावणाच्या प्रतिमेची पूजा करण्यात यावी." भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.आदिवासी समूहासह अनेक संघटनांनी अशोक विजयादशमी दिनी महात्मा रावण यांच्या प्रतिमेची पूजा करण्याचे जाहीर केले आहे.
भिमपँथर मा.राजेश गवळी आपल्या व्हिडीओ मध्ये म्हणतात की , रामायण ही पौराणिक कथा असून त्याला ऐतिहासिक महत्व नाही.परंतु याच कथेनुसार रावण ह्या पात्राकडे एका महान विद्वान राजाचे पात्र म्हणून बघितल्या जाते. रामायण ह्या पौराणिक कथेनुसार महात्मा रावण हे दानी , सत्यवचनी , प्रकांड पंडित , न्यायनिपुन असे महान राजा होते.एका विशिष्ट पात्राला नायकत्व बहाल करण्यासाठी रावण हे पात्र खलनायक म्हणून समाजमनात बिंबविल्या गेलं.
भिमपँथर मा.राजेश गवळी पुढे असे म्हणतात की , रामायण खरे की खोटे याच्याशी आम्हाला काहीही घेणेदेणे नसून तो श्रद्धेचा भाग आहे आणि आम्ही इतरांच्या श्रद्धांचा आदर करतो.परंतु रामायण ह्या कथेतील रावण ह्या पात्राविषयी दक्षिण भारतीय समाजात , आदिवासी समाजात , द्रविडी संस्कृतीत अत्यंत आदराची भावना असून ,आजही महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागात रावणाची , महात्मा रावण म्हणूनच पूजा केली जाते. एका परनारीला , शक्य असताना सुद्धा ,तिच्या अंगाला स्पर्श न करता , तिचा विनयभंग, शीलभंग न करता ,तिला अशोकावाटीकेत सुरक्षित ठेवून तिचा मान सन्मान ठेवणारा सर्वशक्तिमान राजा म्हणून महात्मा रावणाची ख्याती आहे. आपल्या बहिणीच्या अब्रू रक्षणासाठी , तिच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वतःचे राज्य पणाला लावणारा ,किंबहुना स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारा महान भाऊ म्हणून महात्मा रावण भारतीय जनमानसात प्रिय आहे. जगाच्या कोणत्याही पौराणिक कथेत किंवा इतिहासात असा महान त्यागी भाऊ आपल्याला आढळून येत नाही.असे असतानाही वाईटाचे प्रतीक म्हणून महात्मा रावण यांच्या प्रतिमेला दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी दहन करण्यात येते.हा खरे तर इथल्या मूलनिवासी द्रविडी संस्कृतीचा घोर अपमान आहे , आपल्या बहिणीसाठी जीव देणाऱ्या महान भावाच्या महान बलिदानाचा अपमान आहे. तसेच भारतीय लोकांच्या लोकभावनेनुसार महात्मा रावण हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते भारताला एकसंघ ,अखंड करणाऱ्या महान अश्या मौर्य वंशाचे प्रतीक आहेत.महात्मा रावणाला दाखवण्यात आलेली दहा तोंडे ही काल्पनिक असून , ते खऱ्या अर्थाने मौर्य वंशातील दहा राजांचे प्रतिकात्मक रूपे आहेत. कहाणी काही का असेना परंतु पुराणातील रामायण कथेनुसार महात्मा रावण हे मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे.समताधारीत समाजव्यवस्थेचा महान पुरस्कर्ता , न्यायप्रिय , कर्तव्यदक्ष राजाला बदनाम करण्याचे काम इथल्या जातिव्यवस्थेच्या ठेकेदारांनी केले. ज्याप्रमाणे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराजांच्या महान प्रतिमांना कलंकित करण्याचे काम करण्यात आले तसेच महात्मा रावणाची प्रतिमाहनन करण्यात आली. तरीसुद्धा ह्या देशातील अधिकांश बुद्धीवादी जनता महात्मा रावणाला आपला आदर्श मानत आली आहे.अश्या लोकराजा बद्दल सर्वसामान्य जनतेच्या असणाऱ्या भावनांची कदर करत , परंपरेच्या नावाखाली सुरू असलेली रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी. ह्यासाठी कल्याण मधील प्रबुद्ध जनतेच्या वतीने , आदिवासी समाजाच्या वतीने अशोक विजयादशमी दिनी अर्थात २४ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभर , राज्यभर महात्मा रावण पूजन करण्यात येणार आहे.
रिपोर्टर