कांदिवली मधील धनगर कन्या कु.यशश्री भांड चे वैद्यकीय पदवी परीक्षेतील यश.

मुंबई (भारत कवितके  )मुंबई तील कांदिवली या उपनगरातील एकता नगर येथील धनगर समाजाच्या कन्या कु.यशश्री भांड हिने नुकताच जाहीर झालेल्या निकालातBachelor of   Physiotherapy(B.P.T.H.) या वैद्यकीय पदवी परीक्षेत एन.टी.प्रवर्गात महाराष्ट्र राज्यात पहिली आली,व राज्याच्या एकत्रित निकालात बाराव्या क्रमांकाने यशस्वी झाली.कांदिवली येथील झुंजार धनगर समाज संस्थेचे सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल अग्रेसर असलेले प्रमुख सल्लागार रविंद्र भांड यांची ही कन्या असून या तिच्या यशस्वी वाटचालीने कुटुंबात व समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.माझ्या वैद्यकीय सेवेचा जास्ती जास्त उपयोग गरिब रुग्णांसाठी व समाजासाठी करीन .अशी प्रतिक्रिया यावेळी यशश्री भांड हिने आपल्या मुलाखतीत दिली आहे.यशश्री भांड यांना मिळालेल्या या यशाबद्दल तिला सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा मिळत आहेत.


संबंधित पोस्ट