कल्याण (प.) येथील अतिशय उत्साहात सुरू असलेल्या, चैतन्यदायी श्री.राममारूती महाराज पुण्यतिथी उत्सवात भाविकांची रीघ!

कल्याण - सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री राममारूती महाराजांचे १०५ व्या पुण्यतिथी उत्सवास, शनिवार दि. ३० सप्टेंबर पासून, येथील जुना दूधनाका जवळ ( श्री राममारूती चौक, कल्याण) येथील "श्रीं" चे समाधी स्थानी भाविक भक्तांच्या चैतन्यदायी उपस्थितीत अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने शानदार प्रारंभ झाला असून सतत नऊ दिवस  चालणा-या या चैतन्यदायी उत्सवात भाविकजनांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे.

या पुण्यतिथी उत्सवनिमित्ताने समाधीस्थानी  रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांकडून सामूहिक नामस्मरण व दर्शन-आशिर्वाद तसेच विविध भजनी मंडळाची भजने मान्यवरांची कीर्तने,अखंड नामस्मरण पंचामृत पुजा,लघुरुद्र आदि धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक उपक्रम असंख्य भाविक-भक्तांचे चैतन्यमय वातावरणात संपन्न होत आहेत!

सदरहू धार्मिक कार्यक्रमात, विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच परिसरातील अनेक नामवंत गायक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढारी-मंडळी,त्याचबरोबर कल्याण व परिसरातील भाविक तसेच वासिंद-शहापूर-टिटवाला-ठाणे-दादर-बोरीवली-कांदीवली-मालाड-मुंबई आदि भागातून येणारे सर्वसामान्य नागरिक व भक्तमंडळीनी मंदिर परिसर फुलून गेला असून परिसराला, "यात्रेचें" स्वरूप आलेले पहावयास मिळत आहे!

सतत ९ दिवस साजरा होत असणाऱ्यां या उत्सवाची सांगता, रविवार दि.८ऑक्टोबर  रोजी पहाटे ५.१५ वाजता "श्रीं" चे प्रयाणकाळ उत्सवाने होणार असून त्याच दिवशी "काल्याचे कीर्तन" होणार असून दुपारनंतर सर्वाना महाप्रसाद देण्यात येईल व   सायंकाळी ५ वाजता ,"श्रीं" चे पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री.संत राममारूती महाराज हे श्रीसाईबाबांचे समकालीन सिद्धयोगी असून कल्याण येथे त्यांची समाधी असून,हे समाधीमंदिर अतिशय जागृत स्थान असून भाविक भक्तांना यांची प्रचिती आलेली आहे.

या धार्मिक सोहळ्यातील मुख्य आकर्षण म्हणजे," वानप्रस्थ उपासना क्षेत्र " सरळांबे( ता.शहापूर, जि.ठाणे) या धार्मिक संस्थेचे संचालक, ख्यातनाम किर्तनकार,"भाषाप्रभू" ह.भ.प.श्री.जगन्नाथ महाराज पाटील यांचे उत्सवातील शेवटचे तीन दिवस, दिनांक ६-७-८ ऑक्टोबर शुक्रवारपासून रविवार पर्यंत होणारे अतिशय प्रेरणादायक, सुश्राव्य, प्रासादिक किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी भिवंडीमधील ख्यातनाम संत श्री शांताराम भाऊ जयवंत महाराज यांचे एकनाथ मंदिर भजनी मंडळाचे भजनानंदी श्री. भानुदास महाराज आमरे, यांचे नेतृत्व खाली होणारा "अष्टपदी भजन" चा चैतन्यदायी कार्यक्रम होणार आहे!

अश्या या दिव्य स्थानी होणारे धार्मिक कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविकांनी,या स्थानी येवून सहभाग घेऊन, चैतन्यदायी श्री.संत राममारूती महाराजांचे दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावेत व सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन संस्थान तर्फे अध्यक्ष श्री.शिरीष गडकरी यांनी केले आहे.


     

संबंधित पोस्ट