२२ सप्टेंबर रोजी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी बाबत मंत्रालयास घेराव घालणार.
- by Reporter
- Sep 10, 2023
- 441 views
मुंबई (भारत कवितके) रविवार दिनांक १९ रोजी पुणे येथे धनगर समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत चौंडी येथे आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी यशवंत सेनेच्या धनगर समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरु केले आहे, परंतु याकडे शासनाने दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे.अजून पर्यंत यांची दखल शासनाने घेतली नाही.यातील दोन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावली आहे.पुणे येथील बैठकीत चौंडी येथे आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी बसलेल्या उपोषण कर्त्यांना पाठिंबा जाहीर केला.येत्या १७ सप्टेंबर रोजी शासनाने बोलाविलेल्या विशेष अधिवेशन मध्ये धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी बाबत निर्णय घ्यावा.अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्र राज्यात फिरु देणार नाही.राज्य शासनाने केंद्र सरकार कडे या बाबत शिफारस करावी.आज पर्यंत धनगर समाजाला सर्व च पक्षाच्या नेत्यांनी फसवणूक केली आहे.ओबीसीच्या नेत्यांनी ही धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा दिला आहे.जर या आरक्षण अंमलबजावणी बाबत शासनाने काही निर्णय न घेतल्यास २२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील धनगर समाज मंत्रालयास घेराव घालतील असा पुणे येथील बैठकीत इशारा दिला.

रिपोर्टर