पुणे येथे राष्ट्रीय समाज पक्ष्याच्या वर्धापन दिना चे आयोजन.

मुंबई (भारत कवितके ) मंगळवार दिनांक २९ आगस्ट २०२३ रोजी दुपारी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट, पुणे या ठिकाणीं राष्ट्रीय समाज पक्षाचा २० व्या वर्धापनदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यशोधन, समाज प्रबोधन,व राष्ट्रसंघटन ही उद्दिष्ठ असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने भारतातील अनेक राज्यात मुसंडी मारुन आपली ताकद दाखविली आहे,कधी मेळावे घेऊन,कधी जन स्वराज्य यात्रा काढून सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. ३१ मे २००३ मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी या गावी राष्ट्रीय समाज पार्टीची जरी स्थापना झाली असली तरी त्यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कैबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांनी कांशीरामच्या सहवासात ३ ते ४ वर्षे फिरत असताना कांशिराम यांनी ही अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन  केले व त्या मार्गदर्शनाखाली २९ आगस्ट २००३ रोजी निवडणूक आयोगानी राष्ट्रीय समाज पार्टीला दिल्लीतून मान्यता दिली. पुणे स्वारगेट येथे होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या २० व्या वर्धापनदिनाच्या प्रसंगी अनेक राज्यातून पार्टीचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून यावेळी राष्ट्रीय समाज पार्टीचा विस्तार,येणाऱ्या २०२४ मधील निवडणूका बाबत पक्षाची भूमिका, व सर्व सामान्य जनतेच्या न सुटलेल्या समस्या बाबत राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेवजी जानकर मार्गदर्शन  करणार आहेत. 


संबंधित पोस्ट