
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील सहा जिल्हा अध्यक्षांची पक्ष अंतर्गत निवडणुकीनंतर घोषणा !
- by Reporter
- Aug 07, 2023
- 385 views
मुंबई (मंगेश फदाले) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशावरून मुंबई विभागातील जिल्हा अध्यक्षांची निवड करण्याकरिता पक्ष अंतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. आज मुंबई विभागातील ६ जिल्हा अध्यक्षांची निवड पक्षांतर्गत निवडणूक घेऊन करण्यात आली आहे. या संदर्भातील घोषणा आज
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. हरिष मारूतीराव सणस यांच्याकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई विभागातील जिल्हा अध्यक्षांची पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम २०२१-२३ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घटनेतील निवडणूक नियमाप्रमाणे मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस विभागाची निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी व तालुका निवडणूक अधिकारी यांच्या माध्यमातून पार पाडण्यात आलेली आहे. त्यानुसार अँड. हरिष मारूतीराव सणस निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज जिल्हयानुसार त्या-त्या जिल्हयांचे जिल्हाध्यक्ष निवडून आलेल्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागात ६ जिल्हा अध्यक्षांची निवड पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये रुपेश खांडके ( दक्षिण मुंबई जिल्हा ) , सय्यद आरीफ अब्दुल सलाम ( दक्षिण मध्य मुंबई जिल्हा ) , मा.आमदार मिलिंद उर्फ आण्णा कांबळे ( उत्तर मध्य जिल्हा ) , मा.नगरसेवक अजित रावराणे ( उत्तर पश्चिम जिल्हा ) , विजयानंद शिरोडकर ( उत्तर मुंबई जिल्हा ) , मा. नगरसेवक धनंजय उर्फ दादा पिसाळ ( ईशान्य जिल्हाध्यक्ष ) पदांवर निवडून आले आहेत! या संदर्भातील घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे.
रिपोर्टर