शिवसेना वैद्यकीय मदत कक्षावर गिरगावातील गुरुदत्त बोबडे यांची नियुक्ती

मुंबई- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दक्षिण मुंबई विभाग क्र. १४ कक्ष प्रमुख पदासाठी गिरगावातील गुरुदत्त शिवाजी बोबडे यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्धव ठाकरे पासून दुरवल्यानंतर गुरुनाथ बोबडे हे नेहमीच शिंदे गटात राहून समाज सेवेत कार्यरत असतात व गोरगरीब नागरिकांना मदत कार्य करत असतात त्यांची हीच धडपड पाहून दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब,गरजू आणि आर्थिक दुर्बल  घटकांतील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांत (१०%+१०%) राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा  सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य - नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे असे आदेश नियुक्तीपत्र दिले आहेत गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात

अर्थ सहाय्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी,श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यांसारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून गुरुदत्त बोबडे यांनी मदत मिळवून देण्यासाठी थेट शिवसेना भवन येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधावा असे नियुक्तीपत्रात आवर्जून नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट