जयपूर - मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, ४ जणांचा मृत्यू
- by Reporter
- Jul 31, 2023
- 342 views
मुंबई, - मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. जयपूर ते मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की जयपूर -मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दहिसर ते मीरारोडदरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे पाच ही घटना घडली आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अपष्ट आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे.
रेल्वेत गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये एका पोलिसाचा देखील समावेश आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये तणावाचं वातावरण आहे.
रिपोर्टर