मीरा रोडमध्ये जेययुएम कडूनकार्यशाळेचे आयोजन

मीरा रोड - महाराष्ट्रात पत्रकारांसाठी काम करत असलेल्या जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या मीरा - भाईंदर युनिटकडून मीरा- भाईंदर येथील मेघा पार्टी हाॅलमध्ये पत्रकारांसाठी  एक दिवसीय कार्यशाळा व छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते۔यावेळी पत्रकारांना पत्रकारिता व संघटन कौशल्य यावर प्रा۔हेमंत सामंत यांनी मार्गदर्शन केले तसेच पत्रकारिता करित असताना पत्रकारांना येणा-या अडचणी ,त्यांच्या  समस्या आणि त्यावर आवश्यक असणारी उपाययोजना व घ्यावयाची दक्षता यासंबंधी देखील माहिती दिली۔ जेयुएम चे  महाराष्ट्र उपाध्यक्ष के ۔रवि यांनी पत्रकारांना गुन्हेगारी विषयाच्या बातम्या कशाप्रकारे मिळतात आणि त्या लिहिताना कोणती     काळजी घेणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले۔  तर  शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण  पांचाळ यांनी पत्रकारांसाठी असलेल्या शासकीय योजना,सवलती याची माहिती तसेच त्या कशा प्राप्त करू शकतो याची माहिती दिली۔यानंतर यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना छत्री वाटप करण्यात आले۔याप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष नारायण पांचाळ, प्रदेश उपाध्यक्ष के۔रवि,महाराष्ट्र सरचिटणीस प्रा۔हेमंत सामंत,प्रदेश सचिव अॅ ड۔ नामदेव काशीद,प्रदेश खजुनदार दिलीप पटेल, संघटक सतिश साटम,मुंबई अध्यक्ष राजेंद्र साळसकर,जन परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरूण कदम तसेच नया नगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विनायक जाधव, पोलीस उपनिरिक्षक रवि जाधव,ज्येष्ठ पत्रकार अनिल खेडेकर,किरण मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते۔ 

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीरा-भाईंदर युनिटचे अध्यक्ष निलेश फापाळे, सरचिटणीस प्रमोद देठे,उपाध्यक्ष शकिल अहमद यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते۔

संबंधित पोस्ट