सुतार समाजासाठी आर्थिक महामंडळ मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे मानले आभार
- by Reporter
- Jul 25, 2023
- 329 views
मुंबई- गेल्या ७५ वर्षात कोणत्याही सरकारने सुतार समाजाला न्याय दिला नव्हता असे असतांना फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आर्थिक महामंडळाच्या स्वरूपात सुतार समाजाला न्याय दिला आहे पावसाळी अधिवेशनात आर्थिक महामंडळ मंजुर करून सुतार समाजाचे आर्थिक बळ वाढवण्यात आले आहे
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आज घडीला सुतार समाजाची ५० लाख लोकं राहत आहेत. आज कोणत्याही फर्निचरचे काम करताना नवीन प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते या व्यवसायात परप्रांतीय लोकांनी मोठ्या प्रमाणात घुसखोरी केल्यामुळ सुतार समाजातील मंडळींनच्या हाताला काम राहिलेले नाही
शेतीसाठी लागणाऱ्या लाकडी वस्तू बनवून देणाऱ्या गावाकडच्या सुतार मंडळींनाच्या हाताला सुधा करोना काळापासून काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. काही लोक कामधंदा करता करता गावातली घर सोडन गावतन निघून जात आहेत त्यात शिक्षण कमी आणि घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे सुतार समाजातील लोकांना बँक सुधा कर्ज देत नाही कारण त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र नसतात हातावर रोजीरोटिचे काम चालते अशी माहिती अखिल विश्वकर्मीय समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष पराग अहिर यांनी सांगितले
कुणाला कॅन्सर अथवा कुणाचे एक्सीडेंट झाले असेल आणि ज्यां लोकांना सरकारी योजनेतन उपचार होत नसतील अशा लोकांनासाठी हे महामंडळ आर्थिक मदत करण्याच्या विचारात आहे भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली आहेत देशाच्या घडवणुकीमध्ये सुतार समाजाचा महत्त्वाचा वाटा आहे दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय दिला त्यामुळे सुतार समाजाला सावरण्या करता आर्थिक बळ मिळाले आहे
सध्याच्या राजकीय परिस्थिती अशी असुन सुद्धा आमदार संजय रायमूलकर शिवसेना शिंदे गट, मेहकर यांचा प्रयत्नशील कार्याने महाराष्ट्रातील सुतरांचा प्रश्र्न सोडवणयचे काम खूप चांगल्या प्रकारे केले आहे त्यामुळे
अखिल विश्वकर्मीय समाज संघ खूप आनंदात आहे आणि त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले असल्याचे अखिल विश्वकर्मीय समाज संघाच्या पदाधिकारी स्मिता चौधरी यांनी सांगितले आहे
रिपोर्टर