खार दांडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करुन गुरु पौर्णिमा साजरी !!

मुंबई-नुकताच गुरुपौर्णिमा‌ निमित्ताने संत शिरोमणी रोहिदास ट्रस्ट, खार पश्चिम, मुंबई येथे मोठ्या उत्साहाने साजरा झाला.

इयत्ता १ ली ते उच्च शिक्षण घेणाऱ्या ५८ विद्यार्थ्यांना हे सप्रेम भेट शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय  सचिव श्री. उमाकांतजी डोईफोडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई निरीक्षक श्री. राजूजी नेटके, राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई कार्याध्यक्ष श्री. विलासजी गोरेगावकर, आपल्या समाजातील प्रसिद्ध कवी श्री. विलासजी देवळेकर व  संत शिरोमणी रोहिदास ट्रस्टचे माजी सचिव श्री. दिलीपजी दुर्गे आणि एस. एन. डी. टी. कॉलेजचे प्राध्यापक श्री. उदयजी गोवलकर हे उपस्थित होते. मान्यवरांनी या कार्यक्रमात बोलताना पुढील विचार मांडले. श्री. उमाकांत डोईफोडे यांनी आपले विद्यार्थ्यांना भविष्य कालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, श्री. विलासजी गोरेगावकर व श्री. दिलीपजी दुर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. श्री. विलासजी देवळेकर यांनी मुलांचे कौतुक करताना कविता सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री. मिलिंद खैरे यांनी केले होते.

संबंधित पोस्ट