
कांदिवली मधील झुंजार धनगर समाज संस्थेची कार्यकारणी जाहीर.
- by Reporter
- Jul 23, 2023
- 334 views
मुंबई कांदिवली पश्चिम येथील " झुंजार धनगर समाज संस्थे" ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता कांदिवली मधील धनगर समाजातील बांधवांची सर्व साधारण सभा आयोजित केली होती.धनगर समाजातील सामाजिक,शैणणिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या नोंदणीकृत " झुंजार धनगर समाज संस्थे ची कार्यकारणी जाहीर झाली. कार्य अध्यक्ष भारत कवितके, अध्यक्षा सौ.संध्या भांड,उपाध्यक्ष संदिप भांड,सचिव ध्रुपद रवंदळे,उपसचिव सौ.विद्या बोधे,खजिनदार सौ.ज्योती भोजने उपखजिनदार डा.चिंतामणी कुचेकर सभासद विशाल पिसे,राकेश भांड,गायत्री भांड,रविंद्र काळे,दशरथ गरगडे,सुशांत राहटळ,विकास काशिद,प्रमोद भांड,अजय पिसे,उमेश कुचेकर संदिप बिरे,बाळू एकळ, सल्लागार फकिरा राहटळ,रविंद्र भांड,निवृती मराळे अनिता चांगण,नामदेव डफळ सह अनेक धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर