आमदार योगेश सागर यांनी वैष्णवी कुचेकर हिला शिक्षणासाठी लैपटाप भेट

मुंबई (भारत कवितके) कांदिवली भारतीय जनता पक्षाचे चारकोप विधानसभा आमदार श्री. योगेश सागर यांनी कांदिवली पश्चिम मधील इराणी वाडी येथील श्री.गिरीधर कुचेकर यांची मुलगी वैष्णवी कुचेकर हिला पुढील  शिक्षणासाठी लैपटाप भेट दिला. वैष्णवी कुचेकर ही सध्या इंजिनियरींग चे शिक्षण घेत असून तीला शिक्षण घेते वेळी वारंवार लैपटाप ची गरज पडत होती,पण घरच्या गरिब परिस्थितिमुळे इच्छा असूनही तिच्या आई वडिलांना आपल्या तुटपुंजा पगारातून लैपटाप सारखी महागडी वस्तू खरेदी करणे परवडत नव्हते,त्यांनी आपली ही समस्या आपल्याच धनगर समाजातील सामाजीक कार्यकर्ते भारत कवितके यांना सांगितली.भारत कवितके यांनी त्यांना अर्ज लिहून देऊन आमदार श्री. योगेश सागर कडे लैपटाप ची मागणी करायला सांगितली आमदार श्री.योगेश सागर यांनी या गरिब दापत्यांची मागणी पूर्ण केली. त्यांच्या घरी  यामुळें आनंदाचे वातावरण पसरले.वैष्णवी च्या गरिब आई वडिलांनी आमदार श्री. योगेश सागर यांचे मनापासून आभार मानले. व धन्यवाद दिले. आमदार श्री. योगेश सागर यांनी आता पर्यंत अनेक गरिब परिवारांतील मुलामुलीना शिक्षणा करीता,आरोग्या करीता सर्व परीने मदत केली आहे. 


संबंधित पोस्ट