आळंदी मध्ये दिंडी क्र.९१ ची आषाढी वारी पालखी सोहळा पूर्वतयारी बाबत सभा संपन्न.

मुंबई (भारत कवितके)आळंदी मधील धनगर सेवा संघ कार्यालयात श्री.संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळाची पूर्वतयारी बाबत दिंडी क्रमांक ९१ ची चर्चा विनिमय सभा नुकतीच संपन्न झाली.श्री.संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०२३ दिंडी क्र.९१ ची पूर्वतयारी बाबतच्या सभेत दिंडी च्या अनुषंगाने कामाचे विषय हाताळण्यात आले,गाडी ठरविणे लागणारा किराणा,तंबू,जागेविषयीची समस्या,जेवनाच्या पंगती विषयी या घडामोडीवर संस्थेच्या कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव कवितके,सचीव बाळासाहेब डफळ नियोजक ह.भ.प.वारे गुरुजी,ह.भ.प.तुकाराम भोजणे खजिनदार  नवनाथ गवते डी.डी.भोजणे भाऊसाहेब, कार्या अध्यक्ष  नागेश नाना तितर,शिवाजी काळे ह.भ.प भानुदास महाराज दातीर,ह.भ.प.सुरेश महाराज बारगळ,खंडू दातीर,ह.भ.प. रघुनाथ वैद्य ह.भ.प.जगताप महाराज काळे, रंगनाथभाऊ ह भ.प.प्रकाश महाराज काळे मच्छिंद्र वारे,गजानन कवितके सह इतर संस्थेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. 


संबंधित पोस्ट