युमिक राज्य सरकार सोबत सरकारी योजनांमध्ये एकत्र काम करणार - अँड.शिवांगी झरकर

मुंबई - महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि युनायटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या (युमिक)अध्यक्षा ॲडव्होकेट शिवांगी झरकर यांच्यात मंत्रालयात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीस युमिकचे संपूर्ण शिष्टमंडळ उपस्थित होते. याप्रसंगी उद्योगमंत्री मा. ना.उदय सामंत  यांच्याहस्ते  उद्योन युमिकच्या नवीन लोगोचे थाटात अनावरण करण्यात आले.                       

या बैठकीमध्ये युनाइटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षा ॲडव्होकेट डॉ.शिवांगी झरकर ह्यांनी चेंबरची तसेच चेंबर नवीन सुरु करत असणाऱ्या, आयात- निर्यात,स्किलडेव्हलपमेंट, स्टार्टअप अशाप्रकारे च्या प्रकल्पांची यावेळी माहिती दिली. भविष्यात इंक्युबेटर सेंटर व स्किल डेव्हलपमेंट कोर्सेससाठी महाराष्ट्र राज्य सरकार व युनाइटेड मराठी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच एक खूप मोठा इन्क्युबेटर सेंटर याबद्दल उपक्रम राबवणार आहे या यावेळी सविस्तर चर्चा झाली.  उद्योगमंत्रांनी युमिकच्या प्रत्येक सभासदांची व्यक्तिगत माहिती   घेऊन प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टी त्यांनी जोडून दिल्या. उद्योगमंत्री यांच्यासोबत झालेल्या सविस्तर चर्चेत अँड.शिवांगी झरकर,ओंकार भोवर,भक्ती सावंत,राजेश पाटील, विनय जाधव, ऋतुजा कसबे, चारुदत्त पांडे, संगीता मिश्रा, अभिजीत सोनी, अक्षय चव्हाण, विदुला पानवलकर, प्रशांत तळदेवकर,तृप्ती सिनलकर, नीलांबरी, मकरंद शेरकर, सौ. साने आणि इतर सदस्यांची उपस्थिती होती. लवकरच राज्य सरकारसोबत काम सुरु करणार असल्याचं युमिकच्या अध्यक्षा ॲड. शिवांगी झरकर यांनी सांगितलं.

संबंधित पोस्ट