योगीराज गगनगिरी महाराजांचे,"मनोरी आश्रम" स्थानी "१०८ कार्यसिद्धी महायज्ञ" कार्यक्रमाचे आयोजन!
- by Reporter
- Apr 06, 2023
- 401 views
मुंबई-सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्रीक्षेत्र मनोरी आश्रम येथे गुरुवार दिनांक ६ एप्रिल,चैत्र पौर्णिमा (श्री हनुमान जन्मोत्सव) रोजी "१०८ कार्यसिद्धी महायज्ञ" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दर्शनाची वेळ सकाळी ८ ते रात्रौ ८ पर्यत ठेवण्यात आली आहे.
या सामुहिक महायज्ञास सकाळी नऊ वाजल्यापासून प्रारंभ होणार असून,श्री गणेश पूजन, कुलदेवता प्रधान देवता नवग्रह, रूद्र आदी देव-देवताचे पूजन झाल्यावर होमहवन व बलीपूजनानतंर पूर्णाहुती झाल्यावर सर्वाना प्रसाद देण्यात येईल.
धार्मिक कार्यक्रमात जास्तीत जास्त भाविक-भक्तांनी मनोरी आश्रमस्थानी येवून,सहभाग घेऊन स्वामी समर्थ गगनगिरी महाराजांचे दर्शन-आशिर्वाद व महायज्ञाचा लाभ घ्यावा असे आवाहन आश्रम प्रमुख श्री.निशादजी पाटणकर यांनी केले आहे.
रिपोर्टर