स्वामी गगनगिरी महाराजांची शिकवण आचरणात आणा - आशिष महाराज

खोपोली-  स्वामी गगनगिरी महाराजांच्या सर्व भक्तांनी अहंकार विरहित निरपेक्ष भावनेने गुरूसेवा करावी,तसेच नितीमत्तेने वागून सर्वाना मदत करत,महाराजांची शिकवण आचरणात आणून, श्रध्दा-प्रेम-भक्तिभावाने महाराजांचे नामस्मरण करत जीवन सार्थकी लावावे, असा सदुपदेश, महाराजांवरील "चरित्र ग्रंथ " प्रकाशन समयी,खोपोली आश्रम प्रमुख आदरणीय श्री.आशिष यांनी केले.

सदरहू  स्वामी गगनगिरी चरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळा प.पु.स्वामी गगनगिरी महाराज यांची १५ वी पुण्यतिथीच्या पवित्र दिवशी खोपोली आश्रमात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत " परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज अलौकिक चरित्र ग्रंथ " प्रकाशित झाला. या ग्रंथाचे लेखक श्री.आशिष महाराज आहेत. हा ग्रंथ मोठा असून त्यात एकूण ७५२ पेजेस आहेत त्यात १६६ प्रकरणे दिली असून सर्वच माहिती सुंदर आहे.या ग्रंथात विविध प्रसंगाचे एकूण ९३ सुंदर असे फोटो दिलेले आहेत यामध्ये अतिशय दुर्मिळ व अमूल्य माहिती दिलेली आहे. पांढऱ्या शुभ्र जाड कागदावर मोठ्या अक्षरात चांगला टाईप केलेला आहे. या ग्रंथामुळे आपल्या ज्ञानात व भक्तीत भरच पडेल. प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ विक्रीस खोपोली येथील स्टॉलवर उपलब्ध आहे. ज्यांना शक्य आहे अशांनी हा ग्रंथ जरूर घ्यावा,अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.



संबंधित पोस्ट