स्वामी गगनगिरी महाराज चरित्रग्रंथाचे खोपोली आश्रमात शानदार प्रकाशन संपन्न!

    ॐ चैतन्य गगनगिरी नाथाय नम:!!

खोपोली -"अध्यात्मांचे राजे" म्हणून प्रसिद्ध पावलेले सिध्द जलतपस्वी,योगीराज श्रीनाथ गगनगिरी महाराज यांचे संपूर्ण जीवनप्रवासावर आधारित अलौकिक चरित्र ग्रंथाचे,नुकतेच महाराजांचे १५ वे पुण्यतिथीउत्सव प्रसंगी,योगाश्रम खोपोलीमध्ये आदरणीय श्री.आशिष महाराज यांचे शुभहस्ते,पवित्र मंत्रघोषात,महाराजांचे जयजयकारात, अतिशय श्रध्दा-प्रेम-भक्ति भावाने शानदार प्रकाशन संपन्न झाले.

याप्रसंगी महाराजांचे विविध क्षेत्रातील मान्यवर,तसेच विविध आश्रमातील पदाधिकारी,संत-महंत-मठाधिपती,आणि महाराष्ट्राचे विविध भागातून आलेली महाराजांची भक्तमंडळी यांनी आश्रम परिसर फुलून गेला होता.

यावेळी महाराजांचा बैठकीचा पाळणा, समाधीस्थान त्याच बरोबर संपूर्ण आश्रम परिसर विविध रंगीत फुलांच्या माळा सोडून सुशोभित करण्यात आला होता तसेच विविध रंगी व आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर झळाळून गेला होता.

सदरप्रसंगी आदरणीय श्री.आशिष महाराजांनी सर्व भक्तांनी अहंकार विरहित,निरपेक्ष भावनेने गुरूसेवा करावी,तसेच नितीमत्तेने वागून,स्वामी गगनगिरी महाराजांची शिकवण आचरणात आणून मनोभावे नित्य गगनगिरी स्मरण करावे,व जीवन सार्थकी लावावे,असा सदुपदेश केला.

संबंधित पोस्ट