
भायखळाकरानी घेतला गुलाबी थंडीत! चुलीवरच्या रुचकर भोजनाचा मनमुराद आस्वाद...
भायखळा खाद्य महोत्सव २०२३
- by Reporter
- Jan 24, 2023
- 132 views
मुंबई:स्वराज्य फाऊंडेशनचे अध्यक्ष उदय पवार, शांतीदूत सेवा संस्थेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी आणि मंगेश गाढवे यांच्या वतीनं दि.१८ ते २२ जानेवारी याकाळात भायखळयातील फेरबंदर मधील बाटलीबॉय कंपाऊंडच्या मैदानावर भव्य खाद्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.भारतीय जनता पक्षाचे मुंबई अधक्ष आमदार आशीष शेलार,ऊपाध्यक्ष नाना अंबोले,अभ्युदय बँकेचे संचालक संदीप घनदाट,विधीज्ञ जयमंगल धनराज, मनसे उपाध्यक्ष संजय नाईक तसेच सिने अभिनेता विजय पाटकर,जयवंत भालेकर,अभ्युदय नगरची लिटिल चॅम्प गायिका वेदश्री जाधव आणि अनेक
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या वतीने वह्यापुस्तकांचे संच आदिवासी विभागातील विद्यार्थ्याना देण्यासाठी पाठवण्यात येत आहेत.
विविध क्षेत्रात कर्तृत्व बजावत असलेल्यांचा मानसन्मान महोत्सव काळात करण्यात आला.
या महोत्सवात सुस्वर साई भजन,जेष्ठ नागरिकांसाठी कराओके स्पर्धा,मंगळागौर हळदीकुंकू समारंभ लावणी नृत्य आणि होम मीनिस्टर अशी विविध लोकप्रिय कार्यक्रमांची रेलचेल होती.
खाद्य पदार्थांच्या स्टॉल्स वर महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्य पदार्थ खवैय्या रसिकांसाठी पर्वणीच होती.
झुणका भाकर पिठलं भात सोबत तिखट खर्डा,मासळीचे विविध पदार्थ यांना विशेष मागणी होती
महाराष्ट्राची कला खाद्य भ्रमंती घडवून आणणाऱ्या या महोत्सवास विभागीय जनतेचा अभूतपर्व असा प्रतिसाद मिळाला होता
रिपोर्टर