समता मानव सेवा संस्था व फोर्टिस हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या संख्येने संपन्न.

ठाणे- सर्वसामान्य नागरिकांची एकंदरीत गरज पाहता नागरिकांना आरोग्य सेवा व उपचार मिळावे यावी याउद्देशाने समता मानव सेवा संस्था व फोर्टीस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर व डॉ.नेहा सिंग, डॉ.जस्मिन खान यांच्या हस्ते करण्यात आले.  शेकडोच्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला, संस्थेच्या कार्याची  दखल घेऊन, मनाचा मोठेपणा दाखवून, सर्वांच्या मना-मनात  हृदयात असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख केदरजी दिघे, सोबत ठाणे शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे, विभागप्रमुख प्रशांत सातपुते, बाळा राठोडेकर, उपविभाग प्रमुख राजू सौदे,प्रशांत हडकर , शाखा प्रमुख विशाल मैड अन्य कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून संस्थेच्या कार्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमास सदिच्छा भेट देण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेले धर्मेंद्रजी नलावडे, महाराष्ट्र लोकाधिकार समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कदम, ठाणे शहर महिला उपाध्यक्षा श्रीमती रोहिणी निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते भूपती मोरे, सुरेश सरपटे, श्रीमती किरण पवार,  या सर्व मान्यवरांचे स्वागत महापुरुषांची विचारधारा पुस्तकीरुपी ज्ञानाचे भांडार, शेतकऱ्यांच्या आसूड,गुलामगिरी ही पुस्तके महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती. मनीषा बेलोसे, सचिव श्रीमती. सुजाता सांडभोर, जिल्हाध्यक्ष श्री.जितेंद्र बागुल, उपाध्यक्ष श्री.अशोक देवकर,सचिव सचिन यादव ,शांताराम मोरे, संघटक श्री.संजय हुले, श्रीम. प्रिया वाघेरे,  विनोद देशमुख, संतोष घुडे, बाळकृष्ण भागवत यांच्या हस्ते  देऊन करण्यात आले. शेवटी संस्थापक,अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनीआलेल्या मान्यवरांचे, हॉस्पिटलची संपूर्ण टीम तसेच विशेष सहकार्य हींगलाज माता मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी लालजी पटेल आणि कार्यक्रमास सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

संबंधित पोस्ट