
यंत्रणांचा गैरवापर करून बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील
- by Reporter
- Jan 11, 2023
- 264 views
मुंबई ( मंगेश फदाले) - विरोधी पक्षात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्या विरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ईडीचे छापे पडल्यानंतर जयंत पाटील यांनी आदर्श महाराष्ट्रला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर या अगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही,
परंतु आता ईडीने धाड टाकली आहे असे समजते असेही जयंत पाटील म्हणाले.
रिपोर्टर