बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडताना अपघातात, डोक्याला गंभीर मार
- by Reporter
- Jan 11, 2023
- 382 views
अमरावती :अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. अमरावतीमध्ये रस्ता ओलांडत असताना अचानक दुचाकीस्वाराने बच्चू कडू यांना धडक दिली. दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले आहेत.
बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बच्चू कडू यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर पार लागल्याची माहिती असून, डोक्याला चार टाके पडल्याचं वृत्त आहे. बच्चू कडू हे रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळल्यानं डोक्याला मार लागल्याची माहिती आहे.

रिपोर्टर