योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे पुण्यतिथी उत्सवाचे खोपोली येथील आश्रमात भव्य आयोजन !

खोपोली - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वामी श्री गगनगिरी महाराज यांचे खोपोली (रायगड) येथील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या चैतन्यदायी समाधीस्थानी अर्थात योगाश्रम खोपोली येथील श्री गगनगिरी आश्रमांत महाराजांचा १५ व्या पुण्यतिथी उत्सवाचे गुरुवार दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजन करण्यांत आले आहे. 

 या निमित्ताने गुरूवार दि. १२ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यत, समाधीस्थानी विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  असून, त्याची जोरदार तयारी सुरू असून,संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी  सेवेकरी सतत कार्यरत आहेत.

या पुण्यतिथी उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, महाराजांच्या प्रेरणा-आशिर्वादाने,व महाराजांच्या चैतन्यदायी उपस्थितीत स्थापन झालेल्या ,"नाथ गगनगिरी श्रमिक सेवा मंडळ(मुंबई)"या मंडळास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, मंडळ आपला,सुवर्ण महोत्सव खोपोली येथे साजरा करीत आहे. या निमित्ताने मंडळाच्या वतीने आश्रम स्थानी सहस्रचंडी महायज्ञ आयोजित करण्यात आला असून त्याची सुरुवात गुरुवार दिनांक १२ जानेवारी पासून होणार असून सदर महायज्ञाची  सांगता बुधवार दिनांक १८ जानेवारी रोजी होईल. त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता गुरुसप्तशती या ग्रंथाचे सामूहिक पारायण  होणार आहे. 

या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच १९ जानेवारी रोजी पहाटे महाराजांच्या मूर्तीस मंगल स्नान तसेच पादुकांवर अभिषेक पूजन करण्यात येणार असून नंतर काकड आरती व इतर धार्मिक विधी संपन्न होतील. व भाविकांना  दर्शनास सोडण्यात येईल. आणि त्याच दिवशी   गगनगिरी चरित्र ग्रंथाचे प्रकाशन सोहळा संपन्न होईल.

सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-पूजन - नामस्मरण -कीर्तन-प्रवचन-होमहवन भंडारा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले असून सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल,तरी जास्तीत जास्त भाविकांनी या स्थानी येवून सक्रिय सहभाग घेऊन श्री स्वामी गगनगिरी महाराजांचे दर्शन-आशिर्वाद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन आश्रमसंस्था व  नाथ गगनगिरी श्रमिक सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट