संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या मागणीला वेस्ट केअर(जेव्ही) कंपनीचा प्रतिसाद.

मुंबई  मुंबई  महानगरपालीका  क्षेत्रात   संकलन केलेला कचरा डंपीग ग्राउंड पर्यत पोहचवण्यासाठी संपुर्ण मुंबईत क्लिनअप चे जाळे पसरलेले आहे.मनपाच्या ए ते एस विभाग निहाय घकव्य अंतर्गत मंजुर निविदान्वे ठेकेदारी तत्वावरीलअनेक कंपन्या कार्यरत आहेत.वास्तविक पहाता

क्लिनअप वाहनावर काम करणार्या कामगारांना नियमानुसार सर्व प्रकारच्या सुविधा देणे कंपनीस अनिवार्य ठरते . परंतु मुंबईतील बहुतेक कंपन्या कामगारांना सुविधा प्रधान करत नाही असे निर्देशात येते.

दादर स्थीत मनपा जि/उत्तर वार्ड घकव्य अंतर्गत वेस्ट केअर(जेव्ह)नामक कंपनी कार्यरत असुन तेथील बहुतांश कामगारांचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड कामगार संघटना करते.कामगारांच्या विवीध मागण्या पुर्ण करण्यासाठी संघटनेच्या वतीने घरणे अंदोलन उपोषण करण्यात आले.शिवाय मनपाच्या आधिकार्याच्या मध्यस्थीन कंपनी व्यवस्थापन सोबत चर्चा नंतर कंपनीने सकारात्मक भुमिका घेउन नियमानुसार कामगारांच्या बुहुतांश मागण्या मान्य केल्या.प्रामुख्याने रखडलेली राज्य विमा कामगार योजना (ई इस आय सी ) सुरळीत करून सर्व कामगारांना विमा कार्डाचे वाटप करण्यात आले.या वेळी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यानी मनपा आधिकारी श्री ईरपान काझी साहेब तसेत अमोल गिते साहेब सह कंपनीचे श्री ललित शाह व व्यस्थापक सत्तार शेख यांचे आभार प्रकट केले.

संबंधित पोस्ट