कांदिवली मधील धनगर समाज बांधवांनी खासदार राजेंद गावित यांचा केला जाहिर निषेध.

मुंबई(भारत कवितके) कांदिवली मधील धनगर समाज बांधवांनी एकत्रीत येऊन इराणीवाडी रोड नंबर ३, या ठिकाणीं खासदार राजेंद गावित यांनी  संसदेत धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणा बाबत अपमान कारक,पूर्ण माहिती शिवाय अपमानकारक विधान केल्याने खासदार राजेंद गावित विरोधात जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी कांदिवली  पश्चिम मधील धनगर समाज बांधव मोठमोठ्या  प्रमाणात जाहिर निषेध करण्यासाठी एकत्रीत जमा झाले होते.यावेळी कांदिवली मधील धनगर समाजाचे पत्रकार व साहित्यिक भारत कवितके यांनी जाहिर  निषेध सभेत सांगितले की, " संसदेमध्ये शिंदे गटाचे खासदार राजेंद गावित यांनी धनगर समाज  एस.टी आरक्षणाच्या मुद्द्यावर सांगितले की, ' धनगर समाज मागासलेला नसून सधन आहे ५०,१००,२००एकर पेक्षा जास्त जमिनीचे मालक आहेत.मग यांना एस.टी.ची सवलत कशाला?  ' भारत कवितके पुढे म्हणाले," आम्ही कांदिवली मधील धनगर समाज बांधव खासदार राजेंद गावित यांच्या या विधानाचा जाहिर निषेध करीत आहे.संविधानात आदिवासी कटेगिरीतील ४७ जाती जमातीला एस.टी.च्या सवलती असून फक्त ३६ नंबर वर असलेल्या  धनगड जी जमातच आस्तित्वात नसून धनगर  जमात आस्तित्वात  आहे,ती एस.टी.सवलती पासून वंचित आहे. ४६ जाती जमाती ला सवलती मिळतात पण ७५ वर्षापासून धनगर समाजास सवलती मिळत नाही. प्रत्येक जाती मध्यें  ही ३ते ५ टक्के लोक सधन असतातच,तसेच धनगर समाजात असले म्हणजे सर्व धनगर समाज  सधन आहे हे ठरविणे चूकीचे आहे.खासदार राजेंद गावित यांनी अभ्यासपूर्ण  हे विधान केले नसल्याने महाराष्ट्रातील  धनगर समाज या विधानाने नाराज झाला आहे.आम्ही कुणाच्याही हक्काच्या सवलती  हिरावून घेणार नाही. संविधानात ३६ नंबर वर धनगर समाजाचे नाव असल्याने इतर ४६ जाती जमाती प्रमाणे धनगर  समाजालाही सवलती मिळाल्या  पाहिजेत." या जाहिर निषेध सभेत  ,रविंद्र भांड,फकिरा राहटळ,ध्रुपद रवंदळे,दशरथ गरगडे,विकास काशिद,प्रमोद भांड,बाळू भांड,व इतर समाज बांधवांनी  आप आपली मते व्यक्त करुन खासदार राजेंद गावित यांचा जाहिर निषेध केला. या वेळी धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होता.


संबंधित पोस्ट