मुंबईतील अंजुमन महाविद्यालयात मग्न खाद्य सोहळ्याचा जल्लोष सुरू !

मुंबई:(मंगेश फदाले) अंजुमन-ए-इस्लाम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट व कॅटरिंग टेकनॉलॉजि या महाविद्यालयाचा खाद्य महोत्सव व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा दिनांक २० व २१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० ते रात्री १०.०० या वेळेत अंजुमन इस्लामच्या प्रांगणात आयोजित करणार आहेत. थिम डिनर या नेहमीच्या संकल्पने पेक्ष्या काहीतरी वेगळे करायचे असे विद्यार्थ्यानी ठरवले आणि “मग्न” २ के १०  या फूड फेस्टिवल चा जन्म झाला.


कोविड १९ साथीच्या रोगा पुढे आम्हा सर्वांना गुडघे टेकावे लागले होते , आयुष्याला जसा काही विराम लागला होता, दररोजच्या घडामोडीला ब्रेक लागला होता.  ते म्हणतात ना  "सर्व काही कारणास्तव घडते".  या मागील २ वर्षांने  आम्हाला संयम आणि चिकाटी, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, नवीन वास्तव स्वीकारण्याची लवचिकता, नवीन नातेसंबंध निर्माण करणे आणि जुन्या नात्यांशी  पुन्हा जोडणे शिकवले. एकेकाळी घरगुती छंद म्हणून करत असलेली कामे  स्वावलंबी व्यवसायांमध्ये रूपांतरित झाले. आत्मनिर्भरता काय असते हे कोविड १९ ने तुम्हा आह्मा सर्वाना शिकवले.


शैक्षणिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, दरवर्षी हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी एकत्र येतात आणि  फूड फेस्ट- ‘MAGN’ साजरा करतात.

“मग्न” हे विद्यार्थ्याच्या  क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी, त्यांची  सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना सुधारण्यासाठी एक व्यासपीठ असते . 


तसेच हॉटेल मॅनॅजमेण्ट प्रोफेशनल असल्यामुळे चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहून  पाहुण्यांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ह्याच बरोबर विद्यार्थी  विद्यार्थीनीसाठी अनेक स्पर्धेचे आयोजन या दोन दिवसात करण्यात येणार आहे.  मग्न २ के २२  मध्ये २० स्टॉल्स असणार आहेत व हे स्टॉल्स प्रामुख्याने विध्यार्थाना देण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यावसाय कसा करावा. मार्केटिंग, कॉस्टिंग, या अनेक गोष्टी त्यांना शिकण्यास मिळणार आहेत. थिम ला साजेशी अशी सजावट करण्यात येणार आहे. स्टुडंट्स मॅनेजमेंट कमिटी हि सर्व थिम अतिशय मेहनत घेऊन नेहमी यशस्वी करतात.

अंजुमन इस्लाम हि शैक्षणिक संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा अहोरात्र परिश्रम घेत असते. 

ह्या वर्षी सुद्धा सामाजिक बांधीलकी जपत आम्ही मानव फाउंडेशनच्या  ; एक धर्मादाय ट्रस्ट जी मानसिक आजार आणि भावनिक विकार असलेल्या व्यक्तींचा विकास आणि त्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम गेली अनेक वर्ष करत आहेत ह्या सामाजिक संस्थेस आमंत्रित केले असुन त्याना एक व्यासपीठ देण्याचा  प्रयत्न करणार आहोत.

त्याचबरोबर नायर हॉस्पिटलच्या सहकार्याने २१ डिसेंबर रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सन २०१०  मध्ये मग्न सुरु झाल्यापासून उपस्थित असलेले आमचे काही पाहुणे  ज्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आहे, त्यामध्ये  मॉडेल /अभिनेत्री रागेश्वरी, अपरकर्स्ट फूड मॅगझिनच्या  संपादक फरजाना कॉन्ट्रॅक्टर, सेलिब्रिटी शेफ नीलेश लिमये , शेफ सतीश अरोरा, फूड फूड चॅनलचे शेफ शंतनू गुप्ते, शेफ सरुांश गोईला, शेफ अजय चोप्रा, फिटनेस गुरू मिकी मेहता आणि लोकप्रिय फूड शो होस्ट, शेफ विकी रतनानी ,सेलिब्रिटी शेफ राखी वासवानी आणि उद्योजक शेफ हेमंत ओबेरॉय यांचा प्रामुख्याने सहभाग होता

या वर्षी च्या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रोहित खोसला, कार्यकारी उपाध्यक्ष – ऑपरेशन्स, नॉर्थ अँड वेस्ट इंडिया , इंडियन हॉटेल्स कंपनी लि. व प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ शिप्रा खन्ना असणार आहेत.

या मग्न फूड फेस्टिवलला अंजुमन इस्लामचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी , अंजुमन इस्लामचे उपाध्यक्ष्य श्री मुस्ताक अंतुले आणि  डॉ.अब्दुला शेख , हॉटेल मॅनॅजमेन्ट चेअरमन श्रीमती यास्मिन सैफुल्ला तसेच कॉलेज प्राचार्य डॉ. रुकशाना बिलिमोरिया प्राचार्य 

श्री.हरीश सुवर्णा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

२० व २१  डिसेंबर २०२२  या दिवशी सर्व विद्यार्थी , शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन विद्यार्थ्याचे मनोधैर्य वाढवावे अशी  विनंती कॉलेज व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट