महाराष्ट्रद्रोही विरूद्ध हल्लाबोल महामोर्चासाठी मुंबई राष्ट्रवादी सज्ज !

महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली नियोजन बैठक !

मुंबई (मंगेश फदाले) - महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक १७ डिसेंबरला होणार्‍या  'महाराष्ट्रद्रोही विरुद्ध हल्लाबोल' महामोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पार पडली नियोजन बैठक !

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज पार पडली.मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चात जवळ जवळ २० हजार जण सहभागी होतील असे नियोजन करण्यात आले आहे. त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

ही बैठक राष्ट्रवादीचे मुंबई शहर कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. 

या बैठकीला राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, प्रदेश राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, जिल्हा निरीक्षक  विलास माने, दिनकर तावडे, प्रमोद ऊर्फ अप्पा पाटील, ताजुद्दीन इनामदार, उपाध्यक्ष बाप्पा सावंत, राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मुंबई अध्यक्ष सोहेल सुभेदार, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका निरीक्षक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट