राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालणार १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत

मुंबई : नागपुरात होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी ११ दिवसांचा असेल. १९ ते ३० डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्ष नेते आणि गटनेते उपस्थित होते.

नागपुरामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित होण्यापूर्वी हे अधिवेशन एक आठवड्यात गुडाळले जाणार असल्याची चर्चा रंगली होती. कारण मागील दोन वर्षे कोरोना संकटात गेली. त्यामुळे यावर्षी नववर्षाचे सेलिब्रेशन आणि ख्रिसमचे सेलिब्रेशन सगळीकडे जल्लोषात होणार आहे. त्यामुळे दोन आठवड्याचे अधिवेशन एकाच आठवड्यात गुडाळणार असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, नागपुरात होणारे अधिवेशन सहा आठवड्यांचे घेण्याचा करार होता. परंतु, गेल्या काही दशकाचा अनुभव पाहता साधारणतः दोन किंवा तीन आठवड्यांचे अधिवेशन होत आहे. त्यानुसार यंदाचेही अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरु होणार असून ३०  चालणार आहे.

जवळपास तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन विदर्भात होत असल्याने या अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, महापुरुषांचा अपमान अशा अनेक मुद्द्यावरून अधिवेशन अनेक मुद्द्यावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात लव्ह जिहादविरोधा विधेयक आणण्याची तयारी आता सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारने सुरु केली आहे. त्यामुळे हे विधेयक अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

याशिवाय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. याच मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. शिवाय, देशभरातील वाढत्या महागाईचा मुद्दाही या अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट