दादर फेरीवाला संघटनेच्यावतीने अल्पोपहार वाटप
- by Reporter
- Dec 06, 2022
- 329 views
मुंबई- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना आधारस्तंभ एकता सामाजिक संस्था व दादर फेरीवाला संघटना आणि राहिवाशांच्यावतीने नक्षत्र मॉलच्या बाहेर उभारलेल्या मंडपातून अल्पोपहार आणि बाटलीबंद पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमापूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आधारस्तंभ एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतिश थोरात यांनी केले होते. यावेळी संस्थेचे दिनेश थोरात ,संजय करळीकर ,संदिप बोराडे ,रविंद्र कदम,संजय चक्रे तसेच नक्षत्र मॉलचे चेअरमन तपन शाह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
रिपोर्टर