योगीराज श्री गगनगिरी महाराजांचे खोपोली येथील आश्रमांत श्रीदत्तजयंती उत्सवाचे भव्य आयोजन!

खोपोली - प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वामी श्री गगनगिरी महाराज यांचे खोपोली (रायगड) येथील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या चैतन्यदायी समाधीस्थानी अर्थात योगाश्रम खोपोली येथील श्री गगनगिरी आश्रमांत श्री.दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यांत आले आहे. 


या निमित्ताने श्रीदत्तजयंती दिनी बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी पहाटेपासून, समाधीस्थानी धार्मिक कार्यक्रमांस  प्रारंभ होणार असून सकाळी श्रीदत्तझोळीचा कार्यक्रम पार पडणार असून होमहवन भंडारा झाल्यावर दुपारी राष्ट्रभूषण शाहिर श्री रूपचंद चव्हाण आणि मंडळीचा भजनाचा कार्यक्रम होणार असून  त्यानतंर ह.भ.प.श्री.वैभव गुरूजी कांदळगांवकर यांचे श्रीदत्तजन्मोत्सवाचे कीर्तन सोहळा संपन्न होईल. 

सदर उत्सवाच्या निमित्ताने आश्रमस्थानी भजन-पूजन - नामस्मरण -लघुरुद्र - दत्तझोळी - होमहवन भंडारा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यांत आले असून सर्वांना महाप्रसाद देण्यात येईल,तरी जास्तीत जास्त भाविकांनी या स्थानी येवून सक्रिय सहभाग घेऊन श्री स्वामी गगनगिरी महाराजांचे व श्री दत्त महाराजांचे दर्शन-आशिर्वादाचा लाभ घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट