चारकोप-गोराई विभागात संविधान जागर रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई :  संविधान जागर समन्वय समितीच्या वतीने संविधान दिनी भव्य जागर रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीत चारकोप - गोराई विभागातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होत संविधान दिनाचा विजय असो , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सकाळी १० वाजता गोराई येथील पेप्सी ग्राउंड येथून संविधान प्रास्ताविकेचे सार्वजनिक वाचन करून निघालेल्या रॅलीचा समारोप दुपारी १ वाजता चारकोप येथील मिलन स्वीट चौकात संविधान प्रास्ताविकेचे सार्वजनिक वाचन करुन करण्यात आला. यावेळी २६/११ च्या अतिरेकी हल्यात शहिद झालेल्या वीरांना आणि नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रॅलीत लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
      ही संविधान जागर रॅली यशस्वी करण्यासाठी चारकोप - गोराई विभागातील  देवानंद उबाळे, ॲड.राहुल वारे, सी. ओ. ढिवरे,  अंबरसिंग चौहान, पंकज तांबे,  निवृत्ती खरात, अशोक अहिरे, अशोक कांबळे, सिद्धार्थ सारगे, जीवन काट्रे, मनोज खोब्रागडे, दिलीप शिशुपाल, मिलिंद खरात, रवींद्र गजभिये, भाऊसाहेब केदार, अरुण साळवी, रघुनाथ शिरसाट, ॲड. चनकापुरे, मधुकर ननावरे, सर्जेराव अडसूळ, जयंत आढाव, सुरेश गायकवाड, वसंत उबाळे, नारायण कांबळे, समीर कांबळे, श्रीकृष्ण इंगळे, किशोर देठे, मारुती कुंभार, प्रल्हाद शिंदे, सुगंध आळेकर, मनोहर मोकळ, बी. व्ही. घोसाळे, साहेबराव साळुंखे, जी. पी. जाधव, एस.एस.पगारे, रमेश गणवीर, हरिष आनंद आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.