संगीत क्षेत्रातील अभंगे परीवाराचा सूर हरपला! संगीत विशारद अशोक अंभगे यांना पुत्रशोक!
गायक विशाल अभंगे यांचे दुखद निधन!
- by Reporter
- Nov 27, 2022
- 610 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील भडवल गावातील व सध्या अलिबाग येथे राहणारे संगीत विशारद अशोकजी अंभगे यांचा गायक मुलगा विशाल अशोक अंभगे (बबळु), (वय ३४) याचे काल ह्दय विकाराचा तिव्र झटक्याने दुःखद निधण झाले आहे.
दिवंगत विशाल अभंगे यांचा निधणाने अंभगे परीवाराचा सूर हरपल्याचे बोलले जात असुन विशाल उर्फ बबळु यांच्या निधणाने संगीत क्षेत्रात दुःखांचे वातावरण पसरले आहे.
कर्जत तालुक्यांतील भडवल येथिल अंभगे परीवाराची संपुर्ण महाराष्ट्र भर गायन क्षेत्रात ख्याती आहे, गायन क्षेत्रात अंभगे परीवाराची तिसरी पिढी जनतेची सेवा करीत आहेत, सुरुवातीला अभंगे आणि पार्टीचे कवी हीरामणजी अभंगे यांनी कर्जतचे नाव महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पोहोचवले, त्यानंतर त्यांचे चिरंजीव संगीत विशारद अशोकजी अंभगे आणि त्यानंतर आता विशाल अंभगे आणि त्यांचे भाऊबंद हा संगीत क्षेत्राचा वारसा पुढे चालवित होते, मात्र नुकताच गायक कलाकार विशाल अभंगे यांचे ह्दय विकाराने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर समाजभूषण लक्ष्मण उर्फ बंधू अंभगे आणि गायक अरुण अभंगे यांचे विशाल अभंगे हे सख्खे पुतणे होते. संगीत क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या करुना अभंगे यांचेही विशाल बंधू होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच कर्जत तालुक्यांतील अभंगे परीवार पनवेल येथिल करांजडे येथे राहण्यास आले होते, परवा रात्री गायक विशाल उर्फ बबलू अभंगे रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर ईमारती खाली फेरफटका मारण्यास आले असता त्यांना ह्दयविकाराचा तिव्र झटका आला, आणि त्यामधे त्यांचा जागीच म्रुत्यु झाला आहे, बबलू यांच्या म्रुत्युची बातमी पसरताच सर्वांना त्यांचा करांजडे येथिल निवास स्थानकाकडे धाव घेवुन शोक व्यक्त केला आहे, त्यांचेवर करांजडे येथिल स्मशानभुमीत काल दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले, या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील कला, सामाजिक, संगीत, शैक्षणिक, पत्रकार व इतर क्षेत्रातील अनेक मंडळींनी उपस्थितीत लावली होती. विशाल अभंगे यांचा पश्चात त्यांची पत्नी, आईवडील, भाऊ-बहीण, चुलते- चुलती असा मोठा परीवार आहे. या घटनेने मात्र संगीत क्षेत्रात सन्नाटा पसरला असुन प्रंचड शोककला पसरली आहे.
रिपोर्टर