संविधान दिनाचा जनजागृतीसाठी आरपीआयची बाईक रॅली! कर्जत शहरात प्रंचड घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजी!
- by Reporter
- Nov 26, 2022
- 699 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत आज आरपीआय (आठवले) पक्षाचा वतीने आज २६ नोव्हेंबर रोजी “संविधान दिन” मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. यावेळी कर्जत तालुका आरपीआयचा वतीने कर्जत तालुक्यांत भव्यदिव्य बाईक रॅली काढणेत आली.
कर्जत तालुक्यांत मागील कालात आरपीआय तालुकाअध्यक्ष पदी हीरामण रघुनाथ गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर आरपीआय पक्ष प्रंचड वाढला आहे, आरपीआयचा वतीने येथे अनेक सामाजिक कार्यक्रम राबविणेत येत आहेत, त्याच पाश्वभुमीवर आज कर्जत तालुक्यांत आरपीआय आठवले पक्षाचा वतीने तालुक्यांत बाईक रॅली काढुन संविधान दिनाबाबत जनजाग्रुती करण्यात आली आहे. आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, रायगड जिलंहा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, रायगड जिल्हाअध्यक्ष (उत्तर रायगड)चे नरेंद्र गायकवाड, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन कर्जतचे आरपीआयचे तालुका अध्यक्ष हीरामण गायकवाड, महीला आघाडीचा तालुका अध्यक्ष अलकाताई सोनावणे व आरपीआयचा पदाधिकाऱ्यांनी केले होते.
आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी सकाळीच कर्जत तालुक्यांतील विविध खेड्यापाड्यातील आरपीआयचे कार्यकर्ते कर्जत शहरालगत असणाऱ्या सिग्नेचर सीटीमध्ये जमले होते, तेथुन ही रॅली सुरु झाली, कर्जत शहरातील शिवाजी चौकात ही रॅली आणुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन थेट ही रॅली डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचल, डॅा. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ही रॅली कर्जत तालुक्यांतील विविध भागात नेणेत आली आहे, यावेळि आरपीआयचा वतीने जोरदार घोषणाबाजी फटाक्यांची आतषबाजीने संपुर्ण कर्जत शहर हादरले.
दरम्यान ही रॅली यशस्वी करण्यासाठी कर्जतचे आरपीआयचे तालुका अध्यक्ष हीरामण गायकवाड, कर्जत तालुका कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, युवक अध्यक्ष अमर जाधव, आरपीआय कर्जतचा महीला आघाडी तालुका अध्यक्षा अलकाताई सोनावणे,महीला संघटक वर्षाताई चिकणे, कर्जत तालुका संघटक भालचंद्र गायकवाड, कर्जत तालुका उपाध्यक्ष अक्षता गायकवाड, कर्जतचा महीला शहर अध्यक्षा वैशालीताई भोसले, नेरळ शहर अध्यक्षा सुरेखाताई कांबळे, कर्जत तालुका उपाध्यक्ष बबळु ढाले, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष जगदीश शिंदे, उपाध्यक्ष अंकुश सुरवसे, उपसचिव विकास गायकवाड, अमित गायकवाड, प्रविण गायकवाड, दिपक गायकवाड, संदिप गायकवाड, जिवक गायकवाड यांसह कर्जत तालुक्यांतील आरपीआयचा अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घतली आहे.
रिपोर्टर