बहुजन युथ पॅथरचा रायगड जिल्हा संपर्क कार्यालयाचे होणार शानदार उद्घाटन!

पॅथर भाई साहेबांचा स्वागताची जोरदार तयारी!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)-  रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील कर्जत शहरातील इंदीरा नगर दहीवली येथे दिनांक २४ नोव्हेंबर रोजी बहुजन युथ पॅथरचा रायगड जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्धाटन करण्यात येणार असल्याची माहीती रायगडचा ढाण्या वाघ पॅथर प्रविण रोकडे यांनी नुकताच पत्रकारांना दिली आहे, 

दरम्याना या संपर्क कार्यालयाचे उद्धाटन प्रसंगी बहुजन युथ पॅथरचे राष्ट्रीय  अध्यक्ष पॅथर भाईसाहेब जाधव उपस्थितीत राहणार असुन पॅथर भाई साहेब जाधव यांच्या स्वागताची जोरदार तयारी रायगड जिल्हा बहुजन युथ पॅथरने केली असल्याचे माहीती बहुजन युथ पॅथरचा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पॅथर भाई साहेब जाधव यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करणेत येणार आहे. 

विशेष म्हणजे बहुजन समाजातील सर्व  बांधवाना या कार्यालयाचा उद्घाटनान बोलविण्यात आले असल्याने कर्जत तालुक्यांतील बहुजन समाजाचे या  उद्घाटनाकडे लक्ष लागुन राहीले आहे.   तसेच बहुजन चळवळीची आक्रमक संघटना पँथर भाई साहेब जाधव यांच्या नेतृत्व खाली नेहमीच समाजहीतालसाठी लढत आहे. बहुजन युथ पँथर चे रायगड जिल्हा व कर्जत तालुका जनसंपर्क कार्यालयचे भव्य उदघाटन मा भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते गुरवार दि २४ नोव्हेंबर रोजी होत असल्याने बहुजन समाजाला एक हक्काचे न्याययाचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याची तयारी रायगड जिल्हा युथ पॅथरचे अध्यक्ष प्रवीण रोकडे, कर्जत तालुका अध्यक्ष बॉबीशेठ वाघमारे, कर्जत शहर अध्यक्ष आकाश कांबळे, नेरळ शहर अध्यक्ष विवेक पवार यासंह बहुजन युथ पॅथरचे  सर्व पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत,

संबंधित पोस्ट