"छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंह कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा"!

दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार मध्ये मुस्लिम बांधवांचे जोरदार आंदोलन !

मुंबई ( मंगेश फदाले )"छत्रपती शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा"...! 

"काळ्या टोपीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय"...! "तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ-जय शिवराय"...! "राज्यपाल हाय हाय"...! 

अशा गगनभेदी घोषणा देत शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) पदाधिकार्‍यांनी भेंडी बाजार येथे जोरदार आंदोलन केले.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आज दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार येथे फैजुल्ला खान, शरीफ देशमुख, मुख्तार पोपेरे यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मुंबादेवी तालुका विभाग संघटक राजू तोडकर , समन्वयक शकील सिद्दिकी, शाखाप्रमुख दिलीप सावंत, उपशाखाप्रमुख हुसेन शेख, हुसेन शाह, मुजम्मिल मांडवीवाला, साजिद शेख, रहीम पटणी, फैयाज तांबोळी, शेख भाईजान, आयाज शेख, याकूब शेख सह मोठया संख्येने मुस्लिम समाजातील शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट