कर्जत खालापुरात आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीचा माध्यमातुन लढणार;- मा. आम. सुरेश लाड!
राज्यातला फॅार्मुला कर्जत खालापुरात दिसणार!
- by Reporter
- Nov 21, 2022
- 238 views
कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापुरात आगामी काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि आय कॅाग्रेस एकत्रित येवुन महाविकास आघाडीचा माध्यमातुन निवडणुकीस सामोरे जातील अशी घोषणा नुकताच कर्जत खालापुरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश लाड यांनी केली आहे, नुकताच शिवसेना कर्जत खालापुर संपर्क कार्यालय “शिवालय” येथे पत्रकार परीषद पार पडली, त्यामधे या तीनही पक्षाचा नेत्यांनी एकत्रित येवुन ही घोषणा केली आहे,
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ७ खालापुर तालुक्यात १४ ग्रामपंचायतीचा निवडणुका पार पडत आहेत, त्या पाश्वभुमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे, त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीचा निवडणुकीत तसेच आगामी सर्व निवडणुकीत कर्जत खालापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस पक्ष राज्याचा महाविकास आघाडीचा फॅार्मुला वापरणार असल्याचे पार रडलेल्या पत्रकार परीषदेत सांगण्यात आले आहे.
या वेळी या पत्रकार परीषदेत राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, खोपोलीचे सुनिल पाटील, कर्जतचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, खालापुरचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, बाबू घारे यासंह काँग्रेसचे संजय गवळी यासंह या तीनही पक्षाचे अन्य कर्जत खालापुरचे पदाधिकरी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि आय कॅाग्रेस या तीनही पक्षाची ताकद आहे, त्यामुळे राज्यातील महाविकास आघीडीचा फॅार्मुलाच कर्जतमधे निवडणुकीत वापरला तर मोठे यश आगामी काळात महाविकास आघीडीचा माध्यमातुन या तीनही पक्षांना मिळणार आहे, त्यामुळे कर्जत खालापुरात महाविकास आघीडीचा फॅार्मुला आगामी सर्व निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आसल्याचे राजकीय दुनियेत बोलले जात आहे. कर्जत खालापुरात महाविकास आघाडीतुन आगामी सर्वच निवडणुका लढविण्यात येणेची घोषणा झाल्याने कार्यकर्त्यांना अधित जोश आला असल्याचे सांगणेत येत आहे.
दरम्यान ग्रामपंचायतीचा निवडणुका या विधानसभा निवडणुकीची तयारी मानली जात असतानाच, भविष्यात ही महाविकास आघाडी अशीच अबाधित राहील्यास या महाविकास आघीडीचे बलाढ्य आवाहन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर उभे ठाकणार आहे. त्यामुळे थोरवे काय व्युहरचना आखतात आणि महाविकास आघाडीचे आवाहन कसे परतवुन लावतात की कसे? याकडे राजकीय दुनियेचे लक्ष लागुन राहीले आहे. सध्यातरी मात्र महाविकास आघाडीचा तिन्ही पक्षांनी एकत्रित येवुन महाविकास आघाडीचा राज्यातील फॅार्मुला कर्जत खासापुरात तसाच राहविण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे मोठी कोंडी विरोधी पक्षांची झाली असल्याचे बोलले जात आहे.
रिपोर्टर