बालदिनी आदिवासी मुलांना कर्जतमधे ब्लँकेट वाटप!

ऐन कडाक्याचा थंडीत कर्जत इनरव्हील क्लबचा उपक्रम

कर्जत(धर्मानंद गायकवाड);- यावर्षी इतरत्र ठिकाणासह कर्जत तालुक्यांतही काळावधी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे, त्यामुळे जमिनीत अद्यापही ओळावा असल्याने कर्जत तालुक्यांत थंडीचे प्रमाण अधिक असल्याने या थंडीत कर्जतकर चांगलेच गारठले आहेत, त्यामुळे या थंडीपासुन आदिवासीं मुलांचे संरक्षण व्हावे याकरता कर्जत तालुक्यांतील आदिवासी मुलांना कर्जत येथिल इनरव्हील क्लबचा वतीने ब्लॅकेंट वाटप करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यांतील इनरव्हील क्लब नेहमीच अनेक स्तुत्य उपक्रम राबवित असते, त्याचप्रमाणे बालदिनाचे औचित्य साधत इनरव्हील क्लबने मोग्रज येथील आदिवासी मुलां सोबत बाल दिन साजरा केला, 

दरम्यान येथील स्वामीधाम मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, 65 आदीवासी मुलांना क्लबच्यावतीने ब्लँकेट वाटण्यात आली, याप्रसंगी अध्यक्ष उत्तरा वैद्य, एडिटर ज्योत्स्ना शिंदे, तन्वी जोशी, पल्लवी सावंत, सरस्वती चौधरी, मधुरा मुळे, संजीवनी घुमरे, साक्षी अडसुळे, करुणा पराडकर उपस्थित होत्या, तन्वी जोशी यांच्यावतीने मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.




संबंधित पोस्ट