बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गोवा ट्रायलॉथॉन यशस्वी केली

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी गोवा येथे रविवारी झालेल्या हाफ ट्रायलोथॉन स्पर्धेत "गोवा आयन मॅन ७०.३ हा पुरस्कार मिळवला. यात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावणे याचा समावेश असून हे सर्व एकत्रितपणे त्यांनी सात तास एकोणतीस मिनिटात पार केले. मोटे हे महापालिकेतील उत्साही आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून परिचित आहेत. रोजचा व्यायाम, सायकलिंग आणि पोहणे तसेच धावणे हे प्रत्येकाने केल्यास आपले आरोग्य उत्तम राखता येईल असे ते सर्व सहकाऱ्यांना सांगत असतात. "डिटरमिनेशन, डेडिकेशन, डिसीप्लिन" ही त्रिसूत्री ते देतात. २०१७ साली "टाटा ड्रीम रन" मध्ये सहभाग, २०१८ मध्ये टाटा हाफ मॅरेथॉन, २०१९ टाटा फुल मॅरेथॉन (आपला ४२ वा वाढदिवस हा ४२ किमी धावण्यात सहभाग घेऊन त्यांनी साजरा केला), २०२० टाटा फुल मॅरेथॉन केली. आता गोवा ट्रायलोथॉन पार करून त्यांनी नवा विक्रम जोडलेला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा !



संबंधित पोस्ट