नृत्यांगना डॉ. रुपाली देसाई यांचा कलामंजिरी पुरस्काराने सन्मान
- by Reporter
- Nov 14, 2022
- 241 views
मुंबई : कलामांजिरी ह्या संस्कृती कल्चरल अकॅडमीच्या दिमाखदार सोहळ्याच्या पहिल्या पुष्पात सुप्रसिद्ध नृत्यांगना व गुरु रूपाली देसाई यांना कथकनृत्यातील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य अर्थात डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल "कलामंजिरी सन्मान" या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. या अभूतपूर्व सोहळ्यात संस्कृतीचे पदाधिकारी, सुप्रसिद्ध गुरु डॉक्टर मंजिरी देव व पं. मुकुंदराज देव यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पात तालमणी पंडित मुकुंदराज यांच्या संकल्पना आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या अनुभूती या कार्यक्रमाची दमदार प्रस्तुती झाली. यामध्ये ओमकार, नाद, शिव धृपद, विस्तार ,धुंदी आणि भैरवी अशा सादरीकरणातून गायन, वादन, नृत्याचा ऐकात्रित आनंदानी रसिक तृप्त झाले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे संस्कृतीच्या परिवारातर्फे दृकश्राव्य स्वरूपातून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या शुभेच्छांची एक विशेष चलचित्रफित त्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. हा सोहोळा गुरुवर्या डॉ रूपाली देसाई यांच्यासाठी हृदयात साठवून ठेवावा असा सोनेरी क्षण होता. असाच आनंदाचा पाऊस त्यांच्या कला जीवनातून बरसत रहावा, अशी त्यांनी मनिषा एका सुंदर कवितेच्या माध्यमातून व्यक्त केली. रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरातून त्यांना विशेष मानवंदना दिली.
रिपोर्टर