आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचा आनंद मेळावा उत्साहात साजरा

मुंबई : दिव्यांग, विद्यार्थी, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक अशा विविध स्तरावर कार्यरत असलेल्या आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचा आनंद मेळावा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाचं प्रायोजकत्व लाभलं होतं.

सदर प्रसंगी माजी खासदार अॅड. माजिद मेमन सपत्नीक उपस्थित होते. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे इंटकचे पदाधिकारी सुभाष मोरे, राजेंद्र मोहिते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंदी भाषिक सेलचे मुंबई अध्यक्ष मनिष दुबे व जिल्हा युवक अध्यक्ष सचिन नारकर उपस्थित होते. 

सर्वप्रथम आयोजक आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे अॅड. माजिद मेमन यांनी समयोचित मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी सुरेल गीतांचं सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. परेश दाभोळकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले.

संबंधित पोस्ट