डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यास अटक करा; कर्जत रिपाइंने दिले निवेदन!

वारंवार आक्षेपार्ह पोस्ट होत असल्साने संताप!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- कर्जत तालुक्यांतील नेरळ येथिल एका महीलेचा नावे असणाऱ्या फेसबुकवरुन डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात तसेच संविधान विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास नेरळ पोलिसांनी अटक केला आहे, सदर आरोपी अद्यापही अटकच असतानाच पुन्हा राजस्थान मधील कोण्यातरी एका समाजकंटकाने डॉ बाबासाहेब आंबेडकर बद्दल आक्षपार्ह पोस्ट टाकून समाज विघातक कर्म केले आहे, त्यामुळे सदर आरोपीस तात्काळ अटक करण्याचा मागणीचे निवेदन कर्जत पोलिसांना नुकताच कर्जत रिपब्लिक पार्टी ॲाफ इंडीया (आठवले) यांच्या वतीने देणेत आले आहे. 

सध्या ठिकठिकणी संविधान आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोधात काही समाजकंटकाकडुन आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात येत असतात, त्यामुळे अनेकदा आंबेडकर प्रमेींचा भावना दुःखविल्या जात असतात, अनेकदा या धटनांविरोधात विरोधात आंदोलनेही होत असतात, असे असतानाच आता पुन्हा राजस्थान मधील कोण्या एका समाजकंटकाने डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधत एक आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केल्याने याचे पडसाद थेट रायगड आणि कर्जत तालुक्यांतही उमटले आहेत, त्यामुळे या समाजकंटकाला पोलिसांनी त्वरीत अटक करावी याकरता नुकताच कर्जत रिपाइ (आठवले) पक्षाने कर्जतचे पोलिस निरीक्षक श्री. कोल्हे यांना पक्षातर्फे निवेदन दिले आहे. 

यावेळी कर्जत तालुक्यांचे आरपीआयचे तालुकाअध्यक्ष हिरामण गायकवाड, कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड, महासचिव अनंत खंडागले, युवक अध्यक्ष अमर जाधव, तालुका महीला अध्यक्ष अलकाताई सोनावणे, कर्जतचा शहरअध्यक्षा सौ. वैशाली महेश भोसले, नेरळचा शहर अध्यक्षा सौ. सुरेखाताई कांबळे, तालुका संघटक सौ. वर्षाताई चिकणे, नेरळ शहर अध्यक्ष दिनेश आढाव, तालुका उपाध्यक्ष बबळु ढाले, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश सुरवसे, दिपक गायकवाड, सहसचिव जिवक गायकवाड, बाळा संदानशिव, उपसचिव विकास गायकवाड, उमरोली जिप वॅार्ड अध्यक्ष संदिप गायकवाड, रोहित हिरे, यांसह रिपाइंचे विविध पदाधिकारी पोलिसांना निवेदन देताना उपस्थित होते.




संबंधित पोस्ट