चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा ! - राष्ट्रवादी

मुंबई (मंगेश फदाले ) - भा.ज.प प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा मग बोलावे अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

उध्दव ठाकरे यांच्यावर शरद पवार यांनी जादूटोणा केल्याचे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते , त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीने समाचार घेतला आहे. 

महाराष्ट्र भरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि भा.ज.पा वर सोशल मीडिया द्वारे सामान्य जनता टीकास्त्र सोडत आहे. तसेच बावनकुळे यांचे वक्तव्य अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचे अनेक जागरूक बोलत आहेत. बावनकुळे यांच्या वक्तव्याची अनेक जण खिल्ली देखील उडवत असून त्यांना सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.


जादूटोणा, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीतील नाहीत. राजकारण करायचं असेल तर मुद्दयावर राजकारण करा असा इशाराही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना दिला आहे.

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा विसर बावनकुळे यांना पडला असावा असा टोला लगावला आहे. शरद पवार यांची 

पकड महाराष्ट्रावर आहे. तुमच्यासारख्या जातीयवादी पक्षाच्या तावडीतून शिवसेनेला मुक्त करुन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले ही किमया शरद पवार यांची आहे.  त्यामुळे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा तुमचे सरकार पायउतार होणार हे निश्चित आहे. त्यानंतर तुम्हाला जादूटोणा जे काही करायचं ते करा असेही महेश तपासे यांनी बावनकुळे यांना सुनावले आहे.

संबंधित पोस्ट