कर्जत तालुक्यांत ७ ग्रामपंचायतीचा निवडणुका!उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजणांची धडपड!

कर्जतमधे कोण बाजी मारणार? सर्वांचे लक्ष!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील ७ ग्रामपंचायतीचा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकीसाठी ग्रामपंचायतीची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असल्याचे दिसुन येते.

कर्जत तालुक्यांतील मुदत संपलेल्या उक्रुल, कळंब, कोंदिवडे, दहीवली तर्फे वरेडी, मांडवणे, वावळोली आणि वेणगाव या ७ ग्रामपंचायतीचा निवडणुका १८ डिंसेबर २०२२ रोजी होणार आहेत, त्यासाठीचा निवडणुक कार्यक्रम घोषित झाला आहे, तर या ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करणेत येणार आहे, त्यामुळे ही निवडणुक जिंकण्यासाठी योग्य उमेदवारांची चाचपणी अनेक पक्षाचे नेत्यांनी सुरु केली आसल्याचे आता येथे दिसुन येते. 

रायगड जिल्ह्यातील नुकताच कर्जत तालुक्यांतील पोटल ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडी फडकल्यांनतर आता पुन्हा ७ ग्रामपंचायतीचा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे कर्जत तालुक्यांत पुन्हा एकदा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॅाग्रेस एकत्रित महाविकास आघाडीचा माध्यमातुन निवडणुकीस सामोरे जात आहेत, त्यामुळे या ७ निवडणुकीत पुन्हा एकदा शिंदे गटाची “बाळासाहेब ठाकरे शिवसेना” पक्षासमोर महाविकास आघाडीचे आवाहन उभे राहणार आहे. 

दरम्यान या ७ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालानंतर कर्जत तालुक्यांतील राजकीय गणिते बदलु शकतात, त्यामुळे या ७ ग्रामपंचायतीचा निवडणुका प्रंचड प्रतिष्ठेचा काही नेते बनवतील असे राजकीय दुनियेत बोळले जात आहे. तसेच या ७ ग्रामपंचायती ज्या पक्षाची सता येईन त्या पक्षाचे भवितव्य राजकीय दुनियेत चमकणार असल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहेत, 

ग्रामपंचायतीचा निवडणुकीत मुख्य लढत “उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना”, राष्ट्रवादी, कॅाग्रेस महाविकास आघाडी आणि “बाळासाहेबांची शिवसेना”, भाजपा युतीमधे पाहावयास मिळणार आहे, त्यामुळे आता या ७ ग्रामपंचायतीत पोटल ग्रामपंचायतीचा निकालाचे पुनराव्रु्त्ती होते की, परिवर्तन होते याकडे संपुर्ण राजकीय दुनियेचे लक्ष लागुन राहीले आहे.  कर्जतचे आमदार महेद्र थोरवे यांचा “बाळासाहेब शिवसेना” या पक्षासाठी तर ही निवडणुक जिकंणे महत्वाचे असल्याचे बोलले जाते, तसेच महाविकास आघाडीचे आवाहन आता “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाला झेपेन की कस? याकडे संपुर्ण रायगडचा राजकीय दुनियेचे लक्ष लागुन राहीले आहे.

संबंधित पोस्ट