मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कर्जतमध्येही संताप !

कर्जत खालापुरचा महीलांनी पुतळा जाळुन केला निषेध ! तालुक्यांत ठिकठिकणी बोर्ड लावुनही निषेध!

रायगड(धर्मानंद गायकवाड)- राज्यात सध्या मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसंद सदस्या खासदार सुप्रिया सुळे यांचेवर खालच्या भाषेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीमधे संतापाची लाट पसरले आहे, कर्जत खालापुर तालुक्यांतही मंत्री अब्दुल सत्तार यांचा आक्षेपार्ह विधनाचे पडसाद उमटले असुन कर्जत तालुका राष्ट्रवादीने नाक्यानाक्यावर बोर्ड लावुन मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध नेंदविला आहे, दरम्याव राष्ट्रवादीच्या कर्जत खालापुरचा महीला पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळत मंत्री अब्दुल सत्तारांचा विरोधात मोहोपाडा येथे निषेध नोंदविला आहे. 

देशांचा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच खालच्या पातळीला जाऊन आक्षेपार्ह विधान, केले त्याबद्दलचा निषेध राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कर्जत तालुकाअध्यक्षा रंजनाताई धुळे यांनी तालुक्याच्यावतीने नोंदविला आहे, तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळाही राष्ट्रवादीचा महीलांचा वतीने जाळण्यात आला असल्याचे दिसुन आले आहे. तसेच “अब्दुल सत्तार हाय हाय” च्या घोषणा देत काहींनी “अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय” अशा घोषणा देत महीलांनी निषेध नोंदविला आहे. 

दरम्यान कर्जत खालापुर तालुक्यांचा वतीने नोंदविण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमास रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, त्याचबरोबर कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजनाताई धुळे, वंदनाताई थोरवे व इतर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थितीत होते.




संबंधित पोस्ट