कर्जतचा कायापालट करण्याचा विडा आमदार महेंद्र थोरवे यांनी उचलला आहे ;- शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील आमदार महेद्र थोरवे यांनी कर्जत,खालापुर तालुक्यांचा विकास करण्याचा विडा उचलला असल्याचे मत नुकताच शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले. 

शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे आज कर्जत वदप येथील आरोग्य शिबिरास भेट देण्सासाठी आली होते, त्यावेळी मंत्री केसरकर यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या “शिवतीर्थ” निवासस्थानीही भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री दिपक केसरकर बोलत होते, तसेच महाराष्ट्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा नत्रुत्वाखाली “बाळासाहेबांची शिवसेना” पक्ष वाढत असल्साचेही मंत्री दिपक केसरकर यांनी येथे सागिंतले. यावेळी येथे कर्जत मधील अनेक “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचे कर्जतचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रात शिवेसना पक्षात बंडखोरी झाल्यानंतरच रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग आणि महाड या तीनही मतदार-संघाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते, त्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट झाले, बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाचा शिवसेनेला मिळाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेद्र थोरवे, अलिबागचे आमदार महेंद्र दलवी तसेच महाडचे आमदार भरत गोगावले हे बाळासाहेबांचा शिवसेनेत गेले आहेत, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील या तीन आमदारांचा मतदार संघात “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात अनेक शिवसैनिकांनी प्रवेश केला आहे, तसेच “बाळासाहेबांची शिवसेना” पक्ष सध्या राज्यात सत्तेवर असल्याने अनेक मंत्री येथे पक्षाला बळ देणेसाठि रायगडात येत आहेत, त्यापैकीच आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मंत्री दिपक केसरकर कर्जतमधे आले होते, यावेळी कार्यकर्त्यांशी केसरकर यांनी मनसोक्त चर्चा केली आहे. 

दरम्यान कर्जतचे आमदार महेद्र थोरवे यांच्या मागे मुख्यमंत्री आहेत, राज्य शासन आहे, आम्ही आहेत त्यामुळे कर्जतचा मोठ्या प्रमाणावर विकास होईन, कर्जत मधे आल्यानंतर मला थोरवे यांची लोकप्रियता दिसुन आली आहे, असे गौरवोद्गगारही केसरकर यांनी थोरवे यांच्या बाबतीत बोलताना काढले आहेत, त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमघे आणखी जोश निर्माण झाल्याचे येथिल उपस्थित कार्यकर्तयांनी सांगितले आहे.

संबंधित पोस्ट