कर्जत तालुक्यांत ७ हजाराची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यास पकडले; कर्जतमध्ये प्रचंड खळबळ!

कर्जत(धर्मानंद गायकवाड)- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील कशेळे मंडळ अधिकारी दिनेश रमाकांत गुजराथी यांना काल २ नोव्हेंबर रोजी ठाणे लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने ७ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे कर्जत महसुल खात्यात खळबळ माजली आहे.


या बाबत अधिक माहीती अशी की, कशेळे मंडळात मौजे जामरूंग, ता. कर्जत येथील रो हाऊस, नं ६३, बी, इलेक्ट्रॉनिक १, इलेजंट काॅम्पेलेक्स प्लांट नं १९३, नविन २६२, हा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सिल करण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला आहे. त्याकरीता मंडल अधिकारी, दिनेश रमाकांत गुजराथी हे सदरचा रो हाऊस सिल करण्यासाठी १५००० (पंधरा हजार) रपयाची मागणी करीत असले बाबतची तक्रार स्टेट बॅंकचे अधिक्रुत रिकव्हर एंजट यांनी लाचलुचपत विभागाकडे दिली होती.

त्याअनुषंगाने ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी ठाणे लाचलुचपत विभागाने याची पडताळणी कारवाई केली, त्यामध्ये लोकसेवक दिनेश गुजराथी, मंडल अधिकारी,कशेळे, कर्जत, जि. रायगड, यांनी १५ हजार लाचेची मागणी करून तडजोडी अंती, १० हजार रुपयाची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन झाले होते, 

त्यानुसार काल २ नोव्हेंबर २०२२ रोजी ठाणे एसीबी पथकाकडुन सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार कारवाई दरम्यान कशेळे येथिल मंडळ अधिकारी लोकसेवक दिनेश गुजराथी यांनी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ७ हजार रूपयांची लाच स्विकारली असता त्यांना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी दिनेश गुजराथी यांच्यावर कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करणेत आला आहे. या कारवाईने संपुर्ण कर्जत तालुक्यांत तसेच महसुल खात्यात खळबळ माजली आहे. 

 दरम्यान ही कारवाई सापळा ठाणे परीक्षेत्राचे एसीबीचे पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, ठाणे परिक्षेत्र एसीबीचे अप्पर पोलिस अधिक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे एसीबी परिक्षेत्राचे सापला पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश चोपडे, सपोउपनि सोंडकर, पोहवा संदेश शिंदे, म पोहवा दिपाली गणपते यांनी ही कारवाई केली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणे एसीबीचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.

संबंधित पोस्ट